‘धुरंधर’पेक्षाही कित्येक पटींनी जास्त होती ‘या’ हिंदी सिनेमाची क्रेझ, तिकीटासाठी थिएटरबाहेर रस्त्यावरच झोपायचे लोक; 5 किमीपर्यंत लागायच्या रांगा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Mughal E Azam Had More Craze Than Dhurandhar: के. आसिफ दिग्दर्शित हा चित्रपट केवळ एक प्रेमकथा नव्हता, तर एक चित्रपट अनुभव होता, ज्यामध्ये प्रेक्षकांना थिएटर्सकडे आकर्षित करण्याची शक्ती होती.

Mughal E Azam Had More Craze Than Dhurandhar: हिंदी सिनेसृष्टीच्या (Hindi Movies) इतिहासात असे काही सिनेमे आहेत, ज्यांनी केवळ पडद्यावरच सर्वोत्तम कामगिरी केलेली नाही, तर त्यांनी एक मैलाचा दगड रचला. मुघल-ए-आझम (Mughal E Azam) हा असाच एक चित्रपट, जो अजूनही भारतीय चित्रपटसृष्टीतील (Indian Film Industry) सर्वात कल्ट आणि भव्य चित्रपटांपैकी एक मानला जातो. के. आसिफ दिग्दर्शित हा चित्रपट केवळ एक प्रेमकथा नव्हता, तर एक चित्रपट अनुभव होता, ज्यामध्ये प्रेक्षकांना थिएटर्सकडे आकर्षित करण्याची शक्ती होती. प्रेम, त्याग, शक्ती आणि बंडाची ही कहाणी अशा वेळी आली जेव्हा सिनेमा जादूपेक्षा कमी नव्हता.

मुघल-ए-आझमनं इतिहास रचला

‘मुघल-ए-आझम’चं चित्रीकरण 1944 मध्ये सुरू झालेलं आणि 16 वर्षांनंतर 1960 मध्ये शुटिंग पूर्ण झालेलं. या बहुप्रतिक्षित चित्रपटानं असंख्य किस्से, संघर्ष आणि भव्यता मोठ्या पडद्यावर आणली. असं म्हटलं जातं की, सिनेमाच्या निर्मितीवर खूप मोठा पैसा खर्च झाला, ज्यामुळे के. आसिफ यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलेलं. दरम्यान, जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा त्या सिनेमानं असा इतिहास रचला जो, आजही हिंदी सिनेसृष्टीत सुवर्णाक्षरांनी कोरलेला आहे. या चित्रपटानं वर्षानुवर्ष बॉक्स ऑफिसवर राज्य केलंच, याशिवाय राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक मोठे सन्मानही मिळवले.

सिनेमाची तिकीटं मिळवण्यासाठी लोक थिएटरबाहेरच झोपायचे

‘मुगल-ए-आजम’ सिनेमाची त्यावेळी एवढी भयंकर क्रेझ निर्माण झालेली की, त्याकाळी सिनेमाची तिकीट मिळवण्यासाठी लोक थिएटरबाहेर रस्त्यावरच झोपायचे. अनेकजण आपली कामं आटोपून घरातून जेवणाचे डब्बे घेऊन थिएटरबाहेर लाईन लावायचे, रात्री तिथेच रस्त्यावर झोपायचे आणि सकाळी उठून सिनेमाचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे. कित्येक शहरांमध्ये थिएटर्सबाहेर तब्बल 5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या असायच्या. आताच्या डिजिटल युगात थिएटरबाहेर रांगा लावून, तिथेच रात्रभर झोपून तिकीट मिळवणं याचा साधआ विचार करणंही अवघड आहे. पण, त्या काळात हीच सिनेमाची खरी जादू होती.

सिनेमातला ‘तो’ सीन पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलेलं

सिनेमाची भव्यता आजही सिनेसृष्टीतील एक माईलस्टोन आहे. सलीम आणि अकबर यांच्यातील युद्धाच्या दृश्यासाठी 2000 उंट, 4000 घोडे आणि अंदाजे 8000 सैनिक वापरले गेले होते, त्यापैकी काही भारतीय सैन्यातून भरती झाले होते. चित्रपटात दिसणारी भगवान कृष्णाची मूर्ती देखील शुद्ध सोन्याची होती. मुघल-ए-आझम आधी ब्लॅक अॅन्ड व्हाईट स्वरुपात रिलीज करण्यात आलेला. पण, नंतर अनेक वर्षांनी हा कलर प्रिंटमध्ये पुन्हा रिलीज करण्यात आला.

‘धुरंधर’शी होतेय तुलना

आजच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटालाही प्रेक्षकांची अशीच लोकप्रियता आणि प्रेम मिळालंय. ‘धुरंधर’ रिलीज होऊन महिना उलटला तरीसुद्धा त्याची क्रेझ काही कमी होईना. दरम्यान, त्याचं स्वरूप आणि माध्यम बदललं आहे. ‘धुरंधर’, त्याच्या मजबूत कथेसह, भव्य आणि शक्तिशाली कामगिरीसह, हे सिद्ध करतोय की, प्रेक्षक अजूनही भव्य चित्रपट पाहण्यास तयार आहेत. फरक एवढाच आहे की, लोक ‘मुघल-ए-आझम’साठी रस्त्यावर झोपले असताना, ‘धुरंधर’मध्ये अॅडव्हान्स बुकिंग, सोशल मीडिया ट्रेंड आणि डिजिटल रेकॉर्ड तयार होताना दिसतात. ज्याप्रमाणे ‘मुघल-ए-आझम’नं त्याच्या काळात सिनेमाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलेलं, त्याचप्रमाणे ‘धुरंधर’ आजच्या काळात मोठ्या कॅनव्हास आणि स्केलच्या चित्रपटांची भूक प्रतिबिंबित करतोय. दोन्ही चित्रपट त्यांच्या काळातील माईलस्टोन ठरलेले आहेत; एकानं इतिहास रचला, तर दुसरा इतिहासापासून प्रेरणा घेत पुढे जातोय. हेच सिनेमाचं सौंदर्य आहे, जे सर्व युगांमध्ये त्याची जादू टिकवून ठेवतं.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon