टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

भारताच्या मदतीला धावला सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश, आता नो टेन्शन !

अमेरिकेच्या निर्बंधाने बेजार झालेला आणि नुकतेच अमेरिकेची कारवाई झेललेला एक तेल संपन्न तरीही आर्थिक अडचणीत असलेला देश भारताच्या मदतीला धावून आला आहे. त्यामुळे जगातील तेलाचे दर स्थिर होतील असे म्हटले जात आहे.

भारताच्या मदतीला धावला सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश, आता नो टेन्शन !

इराण आणि अमेरिकेतील संघर्षानंतर होर्मुझ स्ट्रेटमधील ( Strait of Hormuz ) वाहतूक संकटात सापडली आहे. त्यामुळे जगात इंधनाची टंचाई सुरु झाली आहे. त्यातच दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएला भारतासाठी मोठा मदतगार बनून पुढे येऊ शकतो. भारताला कच्चे तेल ( crude oil ) पुरवण्याच्या बाबतीत आता व्हेनेझुएला आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.याबाबतीत त्याने सौदी अरब आणि अमेरिका सारख्या मोठ्या देशांना देखील मागे टाकले आहे.

हाच तोच देश आहे, जो गेल्या अनेक वर्षांपासून बिघडती आर्थिक स्थिती, चुकीचे मॅनेजमेंट आणि कठोर आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे अडचणीत आला होता. परंतू अचानक हा देश आता भारतासहीत जगाच्या एनर्जी सिक्युरिटीसाठी सर्वात महत्वाचा सेंटर बनला आहे. कच्च्या तेलाच्या खेळात या व्हेनेझुएलाच्या परतण्याने आता नवा आशावाद व्यक्त होत आहे की जगभरातील इंधनाचे दर कमी होऊ शकतात.

303 अब्ज बॅरलचा खजाना बनला ग्लोबल इकॉनॉमीची चावी

कच्चे तेल (क्रूड ऑईल)च्या शिवाय जगाची चाके फिरु शकत नाही. सर्वात मोठ्या तेल साठ्याचा विषय जेव्हा येता तेव्हा मनात सहज सौदी अरब वा अमेरिकेचे नाव समोर येते. परंतू खरा हुकूमी एक्का व्हेनेझुएला आहे. या देशाच्या जमीनीच्या पोटात सुमारे 303 अब्ज बॅरल कच्च्या तेलाचा विशाल साठा लपला आहे. हा संपूर्ण जगातील तेल साठ्याचा 20 टक्के आहे. अमेरिकेजवळ जितके तेल आहे, त्याच्या पाच पट तेल एकट्या व्हेनेझुएलाकडे आहे.सौदी अरब (267 अब्ज बॅरल)पासून ते कॅनडा (171 अब्ज बॅरल)या बाबतीत खूपच मागे आहेत.

वर्षानुवर्षे खराब मॅनेजमेंट, जागतिक निर्बंधामुळे हा खजाना जमीनीच पडून आहे. साल 2020 मध्ये याचे उत्पादन घसरुन 4 लाख बॅरल प्रतिदिनाहूनही खाली गेले होते. परंतू आता स्थिती बदलत आहे. ओपेक (OPEC) च्या मे 2026 च्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या बंदीनंतर मिळालेली निवडक सूट, शेव्हरॉन (Chevron) सारख्या ग्लोबल कंपन्यांनी केलेल्या गुंतवणूकीच्या बळावर या देशाचे तेल उत्पादन 11.36 लाख बॅरल प्रतिदिन पोहचले आहे. जर या देशाने त्याची संपूर्ण क्षमता वापरली तर आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वेगाने स्थिर होऊ शकतील.

मध्य पूर्वेतील तणाव आणि भारताला संधी

भारत आपल्या गरजेच्या सुमारे 85 टक्के कच्चे तेल परदेशातून आयात करतो. अलिकडील दिवसातील इराण युद्ध, ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ मध्ये व्यावसायिक जहाजांची येजा बाधित झाल्याने मध्य पूर्वेतून येणारा पुरवठा साखळी वाईटरित्या प्रभावित झाली आहे. यामुळे सौदी अरबहून होणारा पुरवठा घसरुन 3.40 लाख बॅरल प्रतिदिन झाला आहे. या कठीण काळात भारतीय रिफायनरींनी वेगाने आपला दिशा व्हेनेझुएलाकडे केली आहे.

व्हेनेझुएला त्याच्या 11.36 लाख बॅरलच्या उत्पादनापैकी 4 लाख बॅरल तेल स्वत:वापरतो. उर्वरित 7.3 लाख बॅरलच्या निर्यातीपैकी भारत एकटा 4.17 लाख बॅरल (मे महिन्याचा डेटा) खरेदी करत आहे. याचा अर्थ व्हेनेझुएलाच्या एकूण निर्यातीच्या 55 टक्क्यांहून जास्त हिस्सा थेट भारतीय बंदरात उतरत आहे. कधी काळी चीन या देशाचा सर्वात मोठा खरेदीदार होता, परंतू चीनच्या सुस्तीचा फायदा रिलायन्स (Reliance), नयारा (Nayara)सारख्या भारतीय कंपन्यांनी उचलला आहे. या रिफायनरी व्हेनेझुएलाच्या जड क्रुड तेलावर (Merey Crude)प्रक्रीया करण्यात जगात सर्वात माहिर आहेत.

ओएनजीसीचे अडकलेले पैसे निघणार

भारताचा डाव केवळ स्वस्त तेल खरेदीपर्यंत मर्यादित नाही. हा धोरणात्मक सुरक्षेचाही मोठा भाग आहे.भारताची सरकारी पेट्रोलियम कंपनी ओएनजीसीने ( ONGC Videsh ) या देशाच्या ऑईल ब्लॉक्समध्ये कोट्यवधी डॉलरची मोठी रक्कम गुंतवलेली आहे. दीर्घकालीन अस्थिरतेने हा पैसा अडकलेला होता. आता हळूहळू येथील परिस्थिती सुधारत असल्याने भारताच्या गुंतवणूकीच्या सुरक्षेची गॅरंटी मजबूत धाली आहे.

जगातील सर्वाधिक तेल साठा असणारे देश –

देश तेल साठा ( अब्ज बॅरलमध्ये )
व्हेनेझुएला 303.22
सौदी अरेबिया 267.2
इराण 208.6
कॅनडा 163.63
इराक 145.02
युएई 113
कुवैत 101.5
रशिया 80
अमेरिका 55.25
लिबिया 48.36
उर्वरित जग 244.23

भारत असा सामना करणार

जगभरातील देश इंधनाच्या टंचाईने बेजार झाले आहे. भारताने आपले धोरण स्पष्ट केले आहे. भारत ऊर्जेसाठी कोणत्याही एका देशावर अवलंबून राहणार नाही. मे महिन्यात भारताची एकूण तेल आयात 8 टक्क्यांनी वाढून 49 लाख बॅरल प्रतिदिन पोहचली आहे. भारताने रशियाकडून सर्वाधिक 19.83 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. तर दुसऱ्या बाजूला युएईला दुसऱ्या नंबरवर ठेवले आहे.आता व्हेनेझुएला मजबूतीने तिसऱ्या क्रमांकावर उभा आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

तारीख आली रे! या दिवशी महाराष्ट्रात मान्सून धडकणार; मुंबईत होणार तुफान पाऊस!

ती माझी मोठी चूक झाली; उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच बच्चू कडू यांच्याबद्दल मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

Special Intensive Revision : नाव नोंदणीसाठी अधिकारी आल्यावर काय कराल? निवडणूक आयोगाने सांगितल्या चार गोष्टी; नोंद करून ठेवा

Mahayuti Mahamandal Vatap: मोठी बातमी: राज्यातील महामंडळाचे महिन्याभरात वाटप, देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची सूचना, महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा?

Rohit Pawar : रोहित पवारांना शरद पवारांची ही गोष्ट खटकली का? म्हणून त्यांनी पक्षाच्या आजच्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा

शुक्रवार, शनिवार किंवा रविवार.. पुन्हा इराण उद्ध्वस्त होणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितली तारीख, हाहाकार..