टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जुन्या 500, 1000 रुपयांच्या नोटांबाबत सर्वात मोठी अपडेट, लोकांमधील तो संभ्रम शेवटी मिटला!

On: April 21, 2026 7:53 PM
Follow Us:

भारतीय रिझर्व्ह बँकेने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी चर्चा रंगली आहे. हा दावा करणाऱ्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत नेमकं सत्य आता समोर आलं आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्वात मोठी आणि शासकीय बँक आहे. याच बँकेकडे भारतीय नोटा छापण्याचा अधिकार आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत अनेक दावे केले जात आहेत.

1 / 5
सोशल मीडियावर 500 आणि 1000 रुपयांची नोट बदलण्यासाठी आरबीआयने नवी सुविधा सुरू केली आहे, असा दावा केला जात आहे. या पोस्टमुळे लोकांमध्ये नवा संभ्रम निर्माण झाला आहे. लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत..

2 / 5
दरम्यान, सोशल मीडियावरील ही पोस्ट लक्षात घेऊन प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने फॅक्ट चेकच्या माध्यमातून हा संभ्रम दूर केला आहे. जुन्या 500 आणि 1000 रुपयांची नोट बदलण्यासाठी आरबीआयने कोणतीही नवी सुविधा दिलेली नाही किंवा तशी कोणतीही व्यवस्था निर्माण केलेली नाही, असे पीआयबीने स्पष्ट केले आहे.

3 / 5
आरबीआयने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणतीही नवी नियमावली तयार करण्यात आली नाही. तसेच कोणताही नवा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आहे. त्यामुळे लोकांनी अशा कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

4 / 5
दरम्यान, 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केली होती. या नोटबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. या नोटा बँकांत जमा करण्यासाठी सरकारने सुविधा निर्माण केली होती.

5 / 5

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now