टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ती माझी मोठी चूक झाली; उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच बच्चू कडू यांच्याबद्दल मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यांना विधान परिषदेची आमदारकी देखील शिवसेनेच्या वतीने देण्यात आली, त्यानंतर आता बच्चू कडू यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

ती माझी मोठी चूक झाली; उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच बच्चू कडू यांच्याबद्दल मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेची आमदारकी देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोला केला आहे.  मी त्यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली, जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. दरम्यान या पक्षप्रवेशावेळी आमदार  अंबादास दानवे, राहुल पाटील आणि खासदार नागेश अष्टीकर यांची देखील उपस्थिती होती.

बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी देखील देण्यात आली. परंतु बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं प्रहारचे कार्यकर्ते नाराज आहेत, मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्रीवर आज हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी  अंबादास दानवे, राहुल पाटील आणि खासदार नागेश अष्टीकर यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले ठाकरे? 

उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर यावेळी जोरदार हल्लाबोल केला आहे.  आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता.  ‘घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या,  कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे एकमेव आमदार होते, मात्र तरी देखील त्यांना महाविकास आघाडीकडून राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर  बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

भारताच्या मदतीला धावला सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश, आता नो टेन्शन !

तारीख आली रे! या दिवशी महाराष्ट्रात मान्सून धडकणार; मुंबईत होणार तुफान पाऊस!

Special Intensive Revision : नाव नोंदणीसाठी अधिकारी आल्यावर काय कराल? निवडणूक आयोगाने सांगितल्या चार गोष्टी; नोंद करून ठेवा

Mahayuti Mahamandal Vatap: मोठी बातमी: राज्यातील महामंडळाचे महिन्याभरात वाटप, देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची सूचना, महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा?

Rohit Pawar : रोहित पवारांना शरद पवारांची ही गोष्ट खटकली का? म्हणून त्यांनी पक्षाच्या आजच्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा

शुक्रवार, शनिवार किंवा रविवार.. पुन्हा इराण उद्ध्वस्त होणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितली तारीख, हाहाकार..