Thalapathy Vijay Gold Challenge: थलपती विजय याच्या TVK पक्षाने चमत्कार घडवला. सत्ता स्थापनेपासून तो अगदी जवळ आहे. पण अभिनेता विजय याच्या समोर सत्ता स्थापनेचे टेन्शन नाही तर RBI चा पाठिंबा मिळवणे हे मोठे आव्हान आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Thalapathy Vijay Gold Challenge: सुपरस्टार थलपती विजय याने तामिळनाडूत चमत्कार घडवला. त्याचा पक्ष TVK सरकार स्थापन करेल. त्याने निवडणुकीत मतदारांना अनेक मोठी आश्वासनं दिली होती. त्यातील सर्वात मोठे आश्वासन हे सोने वाटप करण्याचे होते. थलपती विजयने त्याच्या जाहिरनाम्यात प्रत्येक नवजात बाळाला सोन्याची अंगठी आणि नवरीला 8 ग्रॅम सोने आणि सिल्क साडी देण्याचे वचन दिले होते. विजय याला सत्ता स्थापनेसाठी 10 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. या सरकारला बाहेरून पाठिंबा मिळवणे अवघड नाही. पण तामिळनाडूत दरवर्षी हजारो लग्न होतात आणि लाखो बाळं जन्माला येतात. त्यामुळे लाखो लाभार्थी असतील. या सर्वांना सोने वाटप करायची म्हणजे सरकारी तिजोरी खाली होईल. त्यासाठी विजय यांना RBI ची मदत घ्यावी लागणार आहे.
लोक कल्याण योजनांसाठी मोठा निधी
थलपती विजय याला सरकार स्थापनेचे टेन्शन नाही. त्याने वारेमाफ कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. त्याने जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकाच्या खर्चात 52 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या जनकल्याण योजनांवर 65000 कोटी रुपये खर्च येतो. तो वाढून 1 लाख कोटी रुपयांपर्यंत होईल. TVK पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींच्या लग्नासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे. पक्षाने वार्षिक 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबामधील नवरीला 8 ग्रॅम सोने आणि एक सिल्क साडी देण्याचे आश्वासन दिले आहे.

सध्या 22 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 14,000 रुपये प्रति ग्रॅम आहे. त्या हिशोबाने सोन्याची किंमत जवळपास 1.12 लाख रुपये प्रति लाभार्थी होईल. तामिळनाडूमध्ये दरवर्षी 4 ते 5 लाख लग्न होतात. एका अंदाजानुसार, 60 टक्के कुटुंब हे टीव्हीकेच्या योजनेत बसतात. दरवर्षी जवळपास 2.7 लाख नवरीला सोने द्यावे लागेल. त्यामुळे या लाखो नवरींना 8 ग्रॅम सोने देण्यासाठीच 3000 कोटी रुपये लागतील. हा खर्च राज्याची तिजोरीत खडखडाट करेल.
नवजात बाळाला सोन्याची आंगठी
नवजात बाळाला सोन्याची अंगठी देण्याची घोषणा थलपती विजय याने जाहीरनाम्यात केली आहे. 2011 मधील जनगणनेनुसार तामिळनाडूची लोकसंख्या ही जवळपास 7.21 कोटी इतकी आहे. राज्यात जन्मदर घसरला आहे. वर्ष 2025 मध्ये जवळपास 7.8 लाख मुलांनी जन्म घेतला होता. एका अंदाजानुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना लाभ देण्याचे ठरवले तरी जवळपास 4.7 लाख मुलांना सोन्याची अंगठी द्यावी लागेल. छोटी अंगठी असली तरी त्यासाठी जवळपास 5,000 रुपयांची गरज असेल. म्हणजे राज्य सरकारवर वार्षिक 235 कोटींची गरज पडेल. या सर्व योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर सोन्याची गरज लागले. सोने खरेदी करावे लागेल आणि सोने खरेदी करण्यासाठी नियमांचे पालन करावे लागेल. सोने खरेदीसाठी विजय थलपती यांच्या सरकारला केंद्रीय रिझर्व्ह बँकेची मदत घ्यावी लागेल.
















