Nepal dhading bus accident: नेपाळमध्ये भीषण बस दुर्घटना झाल्याचं वृत्त समोर आलं असून, प्रवासी बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू ओढावला आहे. प्रशासनाला या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव…
Nepal dhading bus accident: नेपाळच्या धदिंग भागात सोमवारी एक अतिशय भयंतर रस्ते अपघात घडल्याची माहिती समोर आली. या अपघातात एक प्रवासी बस चालकानं नियंत्रण गमावल्यामुळं थेट नदीपात्रात कोसळली. ही दुर्घटना इतक्या भीषण स्वरुपाची होती, की यामध्ये 18 प्रवाशांचा मृत्यू ओढवला तर, बसमधील इतर प्रवासी गंभीररित्या जखमी झाले.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव दल घटनास्थळी पोहोचून तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. मात्र हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता, की त्यामुळं परिसरात एकच हाहाकार माजला. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीनं जमखमींना जवळच्याच रुग्णालयात नेलं, तर तपास यंत्रणांनी लगेचच अपघाताचा तपास सुरू केला.
बसमधून किती प्रवासी प्रवास करत होते?
नेपाळमधील या अपघातग्रस्त बसमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये एक महिला आणि एक पुरूष परदेशी नागरिक असून त्यांची नावं समोर आलेली नाहीत. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत 17 मृतदेह सापडले ज्यानंतर आणखी एका मृतदेहाचीसुद्धा ओळख पटली. या बसमधून एकूण 44 प्रवासी प्रवास करत होते. ज्यापैकी 18 जाणांचा मृत्यू ओढावला. मृतांमध्ये 12 पुरूष आणि 6 महिलांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आले. काही कारणास्तव बस चालकाचं स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात ओढावला असं प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.
हा अपघात रात्री उशिरा झाल्या कारणानं अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्यात अनेक अडचणी आल्या. मात्र तरीही संरक्षण यंत्रणांसह स्थानिकांनी बचावकार्यात हातभार लावत जखमींना तातडीनं प्रथमोपचारांसाठी रुग्णालयात पाठवलं. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आजुबाजूच्या भागातूनही नागरिक बचावकार्यात हातभार लावण्यासाठी सहभागी होताना दिसले.








