Chandrapur Hottest City In The World : चंद्रपूर शहाराने राज्यात, देशात देशात नव्हे, तर जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत पाहिले नाव कोरले आहे. सोमवारी चंद्रपूर शहराचा पारा 45.6 अंशावर पोहचला आहे.
Maharashtra Weather Update: विदर्भात तापमानाचा (Temperature) अक्षरक्ष: उद्रेक झाल्याचे बघायाल मिळत आहे. कारण विदर्भातील तापमानाचा पारा बघितला तर साऱ्यांना खरोखर ‘बापरे’ च म्हणण्याची वेळ सध्या सर्वसमान्यांवर आगे आहे. विदर्भात तापमानाचा पारा (IMD) रोज नवे उच्चांक गाठत असताना चंद्रपूर (Chandrapur) शहाराने राज्यात, देशात देशात नव्हे, तर जगातील सर्वात उष्ण (Heat Wave) शहरांच्या यादीत पाहिले नाव कोरले आहे. सोमवारी(21 एप्रिल) चंद्रपूर शहराचा पारा 45.6 अंशावर पोहचला असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच रविवारीही चंद्रपूर देशातले पहिले शहर ठरले होते. त्यानंतर पुन्हा त्यात तापमानाचा उद्रेक होऊन नवा उच्चांक गाठला आहे. (Hottest City In The World)
सूर्य कोपला! ब्रह्मपुरी तिसरे, अमरावती पाचवे सर्वात हॉट
चंद्रपूर प्रमाणेच विदर्भातील इतर जिल्ह्यात अशीच काहीशी परिस्थिती असून ब्रह्मपुरी हे तिसरे तर अमरावती पाचवे देशात अन् जगात सर्वात हॉट शहर ठरले आहे. दरम्यान पुढील 5 दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी सूर्य आणखी कोपणार असून हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांची चिंता अधिक वाढली असून संभाव्य धोका लक्ष्यात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट
पुढील दोन दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाटेचा (Heat Wave) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उत्तर व पश्चिम दिशेने उष्ण वारे वाहत असल्याने विदर्भात उष्णतेची लाट आली असल्याचे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. वातावरण शुष्क (ड्राय) असल्यानेच उन्हाचा तडाखा अधिक जाणवतो आहे. सोमवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून हे तापमान सामान्यपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसने अधिक आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवस (मंगळवार आणि बुधवार) विदर्भातील काही जिल्ह्यात हिट- वेव्ह चा इशारा नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.
दुपारी 12 ते 4 वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळा
मंगळवारी प्रामुख्याने चंद्रपूर, अमरावती, नागपूर आणि अकोल्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर बुधवारी या जिल्ह्यांमध्ये वर्धा जिल्हाची भर पडणार आहे. हवामान विभागाच्या मते ही परिस्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहे. ज्याप्रमाणे दिवसा सामान्यपेक्षा जास्त नोंदवण्यात येत आहे, त्याचप्रमाणे रात्रीच्या तापमानात ही वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरकर नागरिकांनी दुपारी 12 ते 4 वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
गोंदियात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल दुपारी राहणार बंद
दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असून गोंदिया जिल्ह्याचा पारा हा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. अशातच गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 वाजेनंतर ट्रॅफिक कमी झाल्यास व उष्णता वाढल्यास सिग्नल बंद करण्यात येत आहेत व 4 वाजेच्या दरम्यान ऊन कमी होताच व ट्रॅफिक वाढल्यामुळे ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात येतात. यामुळे नागरिकांना भर उन्हात सिग्नल सुरू असल्याने चौकामध्ये थांबावे लागत नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतोय.
इतर महत्वाच्या बातम्या
सुंदर दिसण्यासाठी आणि निरोगी शरीरासाठी स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर….