Team India Schedule: इंग्लंडविरुद्धचा दौरा संपला, आता टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक!

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Team India Schedule: आता टीम इंडिया साधारण एक महिन्यांपेक्षा जास्त दिवस विश्रांती घेईल. ऑगस्टमध्ये भारताचा कोणताही सामना नाही. यापूर्वी संघ बांगलादेश दौरा करणार होता.

Team India Schedule: भारतीय संघाचा इंग्लंड (India vs England) दौरा संपला आहे. शुभमन गिलच्या (Shubhman Gill) संघाने या दौऱ्यात शानदार कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली. आता टीम इंडिया साधारण एक महिन्यांपेक्षा जास्त दिवस विश्रांती घेईल. ऑगस्टमध्ये भारताचा कोणताही सामना नाही. यापूर्वी संघ बांगलादेश दौरा करणार होता. तीन एकदिवसीय सामन्यांसह तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार होती. परंतु गेल्या महिन्यातच बीसीसीआयने एक निवेदन जारी करून ती पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे.

टीम इंडिया आता थेट आशिया कपमध्ये खेळणार- (India vs Pakistan Asia Cup 2025)

भारतीय क्रिकेट संघ आता थेट आशिया कप 2025 मध्ये मैदानावर दिसणार आहे. ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान टी-20 स्वरूपात आयोजित केली जाईल. भारतीय संघाला 10 सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. त्यानंतर 14 तारखेला संघ पाकिस्तानशी भिडेल. 19 सप्टेंबर रोजी भारत ओमानशी भिडेल. यानंतर सुपर-4 सामने होतील. सुपर-4 मध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे.

आशिया कप 2025 कुठे खेळवला जाणार?

यंदा आशिया कप संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये आयोजित केला जात आहे, जिथे स्पर्धेचे सर्व सामने अबू धाबी आणि दुबई येथील दोन मैदानांवर खेळवले जातील. यावेळी या स्पर्धेत एकूण 19 सामने खेळले जातील, त्यापैकी 11 सामने अबू धाबीमध्ये आणि 8 सामने दुबईमध्ये खेळले जातील. आशिया कपचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

भारत कोणत्या गटात?

भारत आणि पाकिस्तानचा गट अ मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत यजमान यूएई आणि ओमान या संघांचाही या गटात समावेश आहे. त्याचवेळी, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांना गट ब मध्ये स्थान मिळाले आहे. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील उर्वरित संघांशी एकदा सामना करेल आणि टॉप-2 संघ सुपर 4 फेरीत पोहोचतील. या फेरीत, संघ पुन्हा एकदा एकमेकांशी भिडतील.

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

  • 9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
  • 10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
  • 11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
  • 12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
  • 13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
  • 14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
  • 15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
  • 16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
  • 17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
  • 18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
  • 19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना

  • 20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
  • 21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
  • 23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
  • 24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
  • 25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
  • 26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
  • 28 सप्टेंबर – अंतिम सामना

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon