टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?

Follow Us:

Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash: दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूचे गुढ अजूनही सुटलेले नाही. हा अपघात होता की घातपात यावर खल सुरू असताना, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी तपास यंत्रणांच्या कार्यशैलीवर मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण... सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?

Supriya Sule on Black Box: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर इतर पक्षातील नेत्यांनी जाहीर व्यक्त केला. आमदार रोहित पवार यांनी तर चार पत्रकार परिषद घेऊन याविषयीचे काही पुरावे सादर केले आणि हा घातपात असल्याचा दावा केला. त्यांच्या प्रयत्नानंतर कर्नाटकात या विमान अपघाताप्रकरणी झिरो एफआयआर दाखल झाला. पण महाराष्ट्रात अद्याप दादांच्या विमान अपघाताप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान याप्रकरणी आता खासदा सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

दादांचा फोन सापडला, ब्लॅक बॉक्सचं झालं काय?

अजितदादांचा ब्लॅक बॉक्स सापडला. पण विमानाच्या ब्लॅक बॉक्सविषयी पुन्हा काहीच चर्चा झाली नाही. काहीच माहिती समोर आली नाही, असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. त्यांनी तपास यंत्रणांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. दादांच्या अपघात प्रकरणात सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. किती दिवस उलटून गेले तरी ब्लॅक बॉक्सविषयी कोणतीही माहिती दिली नाही, असे सुळे म्हणाल्या.

दादांचा फोन सापडला मग, ब्लॅक बॉक्सची माहिती का समोर येत नाही. अगोदर म्हणाले ब्लॅक बॉक्स मिळाला नाही, मग म्हणाले मिळाला. मग मध्येच अफवा आली की ब्लॅक बॉक्स जळाला. आमच्या घरात ही दुर्दैवी घटना घडली. पण असा अपघात कुणाचाच होऊ नये यासाठी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

ब्लॅक बॉक्सचे झाले काय?

अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सचे मोठे नुकसान झाल्याचा अगोदर दावा करण्यात आला होता. रोहित पवार यांनी आणि अमोल मिटकरी यांनी याप्रकरणावर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला. रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्स परदेशात तपासणीसाठी पाठवण्याचा आग्रह धरला होता. पण गेल्या काही दिवसात या ब्लॅक बॉक्सविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान रोहित पवार यांनी व्ही. के. सिंग यांना अटक करण्याची आणि अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई आणि बारामतीत आंदोलन केले होते. पण त्याला यश आले नाही.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now