Solapur Madha Crime News: माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू (Crime News) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Solapur Madha Crime News: माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू (Crime News) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र या अपघातावर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून हा घातपाताचा (Madha Crime News) डाव असल्याचे म्हटलंय. दरम्यान, या प्रकरणी माढा पोलीसात तिच्या शिक्षक पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पुढील तपास सुरु केला आहे.
Madha Crime News: लग्नानंतर पतीकडून दारूच्या नशेत मारहाण, शिवीगाळ; माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी
माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे भाग्यश्री रविंद्र क्षिरसागर असे मृत्यू झालेल्या विवाहीत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या भावाने माढा पोलीस ठाण्यात शिक्षक पती रविंद्र क्षिरसागर विरोधात तक्रार दिली आहे.भाग्यश्री यांचे 2011 मध्ये रविंद्र क्षिरसागर यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर पतीकडून दारूच्या नशेत मारहाण, शिवीगाळ, तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. याशिवाय, चारित्र्यावर संशय घेऊनही वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Solapur Madha Crime News: घातपाताचा संशय, पतीविरोधात गुन्हा दाखल
अशातच, घरामध्ये निष्काळजीपणे उघड्या विद्युत तारा ठेवल्यामुळे भाग्यश्री यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्या खाली पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, या घटनेत घातपाताचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी शिक्षक पती रविंद्र क्षिरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. तपासाअंती नेमकं काय सत्य बाहेर येतं हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.












