सोलापूर : महिला तलाठी व महसूल सहाय्यक सतरा हजाराची लाच घेताना सापडले

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सोलापूर, 5 एप्रिल (हिं.स.)।

शेत जमिनीवर मुलांची नावे लावण्या कामी प्रस्ताव तयार करून बार्शी तहसील कार्यालयाला पाठवण्यासाठी 17 हजाराची लाच घेणाऱ्या महिला तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्या तलाठ्यास लाच घेण्यात प्रोत्साहन देणाऱ्या महसूल सहाय्यकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

ऐश्वर्या धनाजी, शिरामे, पद तलाठी, (वर्ग- ३), नेमणूक सज्जा ताड सौंदणे, तहसिल कार्यालय बार्शी अंतर्गत रा. अंबीका गृहनिर्माण सोसायटी, परांडा रोड, बारंगुळे प्लॉट, बार्शी व रविंद्र आगतराव भड, पद महसूल सहाय्यक, (वर्ग- ३), नेमणूक तहसिल कार्यालय बार्शी रा. अरिहंत बोपलकर हॉस्पीटल समोर, देवकर प्लॉट बार्शी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे नावे आलेल्या शेत जमीनीचा महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटप पत्र होवून त्यांचे मुलाचे नावे होणे करीता तलाठी कार्यालय ताड सौंदणे यांचेकडे अर्ज सादर केला होता.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon