Solapur Accident : करमाळ्यात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. वीट येथील भुजबळ वस्तीजवळ इनोव्हा कार व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे.

Solapur Accident News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. वीट येथील भुजबळ वस्तीजवळ इनोव्हा कार व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मोटारसायकलवरील तीन जणांचा जागीच  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

करमाळा तालुक्यात इनोव्हा कार व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मोटारसायकलवरील हनुमंत केरु फलफले (35), कांचन केरु फलफले (30, दोघे रा. अंजनडोह, ता. करमाळा) व स्वाती शरद काशीद (25, ता. सराफवाडी, ता. इंदापूर) यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नेमका अपघात कसा झाला, कोणाची चूक होती, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon