Sitaare Zameen Par Box Office: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याला मोठा धक्का, ‘सितारे जमीन पर’ सिनेमाने कमावले फक्त इतकेच कोटी, सिताऱ्यांची जादू ओसरली? सर्वत्र सिनेमाची चर्चा…
Sitaare Zameen Par Box Office: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान स्टारर ‘सितारे जमीन पर’ सिनेमाची सध्या चर्चा सर्वत्र तुफान रंगली आहे. ‘तारे जमीन पर’ सिनेमाने सर्वांना रडवलं, पण ‘सितारे जमीन पर’ सिनेमाने मात्र सर्वांना पोट धरुन हसवलं आणि भावूक केलं… याच कारणामुळे अभिनेता आमिर खान याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जातं. पण बॉलिवूडच्या परफेक्शनिस्टला सोमवारी मोठा झटका लागला आहे. कारण बॉक्स ऑफिसवर सिनेमाने हवी तशी कमाई केली नाही. सिनेमा 100 कोटींचा गल्ला कधी पार करते याच प्रतीक्षेत निर्माते आहेत.
आमिर खान स्टारर ‘सितारे जमीन पर’ सिनेमाचा बजेट 90 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत सिनेमाने भारतातून चांगली कमाई केल्याचं दिसून येत आहे. पहिल्या दिवशीचं कलेक्शन फारसं चांगलं नसलं तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मोठी कमाई झाली. दरम्यान, चौथ्या दिवसाची म्हणजेच पहिल्या सोमवारची कमाई आली आहे.
रिपोर्टनुसार, ‘सितारे जमीन पर’ सिनेमाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 8.50 कोटींची कमाई केली आहे. जी पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत देखील फार कमी आहे. भारतात सिनेमाने आतापर्यंत फक्त 66 कोटींचा गल्ला जमा केला आहे.
पहिल्या दिवशी सिनेमाने 10.07 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 20.02 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 27.25 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पण चौथ्या दिवशी सिनेमाला मोठा धक्का बसला आहे. चौथ्या दिवशी सिनेमाने फक्त 8.50 कोटींची कमाई केली आहे.
सिनेमाला मिळत असलेल्या प्रतिसादाने आमिर खान आणि त्याची टीम खूप खूश आहे. पण जर या आठवड्यात सिनेमाचे बजेट वसूल करायचे असेल तर संपूर्ण आठवड्यात सिनेमाने 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणं महत्त्वाचं आहे. सांगायचं झालं तर, 90 कोटींमध्ये बनलेला हा सिनेमा आतापर्यंत भारतातून फक्त 66.65 कोटी कमवू शकला आहे. म्हणजेच आता हिट होण्यासाठी त्याला फक्त 24 कोटींची आवश्यकता आहे.
याशिवाय, सितारे जमीन पर सोबत प्रदर्शित झालेला ‘कुबेरा’ देखील वाईट कामगिरी करत आहे. धनुष आणि रश्मिका मंदान्ना यांचा सिनेमा परदेशात चांगली कामगिरी करत आहे. पण भारतात सिनेमाने फक्त 6.50 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाने आतापर्यंत 55.10 कोटींची कमाई केली आहे.