टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दही, मीठ टाकून खावे की साखर घालून? 99 टक्के लोकांना कुठे माहितीये उत्तर?

Health Tips : शरीरासाठी दही खाणे फायदेशीर असते. भारतात जेवणात दही खाणे हा अन्न संस्कारात मोडतो. काही जण मीठ टाकून तर काहींना साखर घालून दही आवडते. पण दोघांपैकी कोणती आहे योग्य पद्धत?

दह्यात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे भारतीय थाळीत दह्याला महत्त्वाचे स्थान आहे. काही लोकांना तर ताटात दही नसेल तर जेवल्यासारखे वाटत नाही. अनेक अन्न पदार्थ, भाज्या तयार करण्यासाठी दह्याचा घटक म्हणून वापर अगदी सहज होतो. पण दही खाताना ते मीठ टाकून खावे की साखर घालून खावे याविषयीचा संभ्रम असतो. आता या लेखानंतर तुमच्या मनातील हा संभ्रम दूर होईल .

मीठासह दही खाल्यास होते काय?

दह्यात मीठ घालून खाल्यास त्यातील गुड बॅक्टेरिया, चांगले सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे दही खाणे शरीरासाठी फारसे लाभदायक नसते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर दह्यात मीठ टाकू नका. हे शरीराला अपायकारक आहे. आयुर्वेदानुसार, दह्यात मीठ टाकून खाल्यास शरीरावर नकारात्मक प्रभाव दिसून येतो. पित्ताची समस्या वाढते. पित्तासाठी दह्यात मीठ घालून खाणे हे विषासमान आहे. दह्यात मीठ घालून खाल्ल्यास पचनास त्रास होतो. तुम्हाला जर पोटाचे आजार असतील तर ही पद्धत चुकीची आहे. अशा पद्धतीने दह्याचे सेवन आरोग्यास अपायकारक ठरेल. खोकला असेल तर दह्यात मीठ टाकून खाऊ नका.

दह्यासोबत साखर किती फायदेशीर?

दह्यात साखर टाकून खाणे अनेकांना आवडते. त्याचा थेट शरीरावर परिणाम दिसून येतो. साखर टाकलेले दही शरीरासाठी फायदेशीर ठरते. साखरेमुळे दह्यातील सूक्ष्म जीवाणू नष्ट होत नाहीत. पोटातील जळजळ कमी होते. पोटाला थंडावा मिळतो. साखर घातल्याने शरीराला उष्मांक, कॅलरीज अधिक प्रमाणात मिळते. थोडं वजन वाढण्याची शक्यता असते. मधुमेहींनी गोड दह्यापासून चार हात दूर राहावे. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची भीती असते.

दही खावे कसे?

शरीरासाठी दह्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. अगदी कमी प्रमाणात मीठ आणि साखर घालून ते खाता येते. पण तुम्हाला सर्दी-पडसं, उच्च रक्तदाब, डायबेटिज अथवा इतर आजार असेल तर वैद्यकीय तज्ज्ञाच्या सहाय्यानेच तुम्ही दह्याचे सेवन करणे आवश्यक आहे. दही खाण्यापूर्वी अथवा नंतर लागलीच गरम पेय, पदार्थ खाणे टाळले तर फायदेशीर होईल. दह्यासोबत मद्यपेय पिणे हा तर घातक प्रकार आहे. त्यामुळे शरीराला अपाय होऊ शकतो. काही जण रात्री अति दारु पिल्यावर सकाळी खापरातील दह्याचे सेवन करतात. त्यामुळे शरीरातील उष्णता आणि पोटाचे आजार कमी होतात असा दावा करण्यात येतो. पण असा प्रयोग करताना वैद्यकीय तज्ज्ञाचा, आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या. साखर असो वा मीठ ते अगदी कमी प्रमाणात वापरल्यास दह्याचे सेवन फारसे अपायकारक ठरत नाही.

डिस्क्लेमर : उपलब्ध स्त्रोतांआधारे ही सर्वसाधारण माहिती देण्यात आली आहे. तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.

हे सुद्धा वाचा
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा