समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे लहान व अजाणती मुले देखील यामध्ये सहभागी होत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना जालना शहरात घडली आहे. फक्त 14 वर्षाच्या मुलीने आपल्या सात वर्षीय चुलत बहिणीचा ब्लेडने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेने खळबळ उडाली आहे. ईश्वरी रमेश भोसले असे मयत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान यातील अल्पवयीन आरोपी मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिशय शुल्लक कारणावरून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ईश्वरी आज सकाळी आंघोळीला गेली होती. तिच्या मागोमाग आलेल्या आरोपी बहिणीने बाथरूमचा दरवाजा आतून लावून घेतला. तिने ईश्वरीच्या हातावर व गळ्यावर वार केला. यात ईश्वरीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.