टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Shivsena Candidate List : एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी, शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर

On: June 1, 2026 12:26 PM
Follow Us:

Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: शिदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला ठाण्यासह नाशिक, परभणी आणि यवतमाळ विधान परिषदेची जागा आली आहे.

Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत.

शिदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला ठाण्यासह नाशिक, परभणी आणि यवतमाळ विधान परिषदेची जागा आली आहे. या चार जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची नावंही समोर आली आहेत. ठाण्यासह नाशिक, परभणी आणि यवतमाळ विधान परिषदेची जागा आली आहे. ठाण्यातून रवींद्र फाटक, नाशिकमधून नरेंद्र दराडे, परभणी-हिंगोलीमधून सईद खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर यवतमाळच्या जागेसाठी 3 उमेदवार शर्यतीत आहेत. यामध्ये दुष्यंन्त चतुर्वेदी, किरण पांडव,सलीम खातून यांचा समावेश आहे. (Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026)

एकनाथ शिदेंची स्मार्ट खेळी; अल्पसंख्यांक तरुणाला दिली विधान परिषदेची उमेदवारी (Shivsena Vidhan Parishad Election 2026)

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पसंख्यांक समाजातील युवा चेहरा सईद खान यांना उमेदवारी देत राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी समजले जाणारे सईद खान हे सध्या शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे मराठवाड्यातील अल्पसंख्यांक समाजाला थेट प्रतिनिधित्व देण्याचा संदेश महायुतीकडून देण्यात आल्याचे मानले जात आहे.शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांसोबतच अल्पसंख्यांक समाजातही पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी ही उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी टाकलेली ही राजकीय खेळी चर्चेचा विषय ठरत आहे. सईद खान यांच्या उमेदवारीमुळे परभणी-हिंगोलीच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अल्पसंख्यांक समाजात या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे.

विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी- (Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026)

  1. ठाणे- रवींद्र फाटक

  2. नाशिक- नरेंद्र दराडे

  3. परभणी-हिंगोली- सईद खान

  4. यवतमाळ- दुष्यंन्त चतुर्वेदी, किरण पांडव,सलीम खातून (संभाव्य)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now