एकनाथ शिंदेंनी ‘त्या’ नेत्याला दिलेला शब्द पाळला, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकासाठी अखेर शिवसेनेकडून नाव जाहीर

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी पोटनिवडणूक होत आहे. भाजपने संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. शिवसेना (शिंदे गट) ने चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत.

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जांगासाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप तीन, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा दिली जाणार आहे. यानुसार, काल भाजपकडून विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले. यात संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी या तिघांचा समावेश आहे. यानंतर आता विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून एक नाव जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा विधानपरिषदेवर पाठवलं जाणार आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा आली आहे. यासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र यात धुळे–नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर होते. त्यासोबतच शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांचीही नाव चर्चेत होती. अखेर आता चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला, असे बोललं जात आहे.

विधानपरिषदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य आमश्या पाडावी हे अक्कलकुवा मतदार संघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पाडवी यांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली होती. सव्वातीन वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे.

कोण आहेत चंद्रकांत रघुवंशी?

  • चंद्रकांत रघुवंशी हे 1992 पासून काँग्रेस पक्षात सक्रीय राजकारणात आहेत.
  • चंद्रकांत रघुवंशी 1992 मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन धुळे व नंदुरबार जिल्हा एकत्रित असताना सहा वर्षे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.
  • त्यानंतर सलग तीनवेळा ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
  • आमदारकीची मुदत एप्रिल 2020 मध्ये पूर्ण होणार होती. मात्र तत्पूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
  • त्यानंतर जुलै २०२२ रोजी त्यांनी एकनाथ यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी?

भाजपा

1) संजय किणीकर- संभाजीनगर

2) दादाराव केचे- वर्धा

3) संदीप जोशी – नागपूर

शिवसेना

1) चंद्रकांत रघुवंशी- नंदुरबार

राष्ट्रवादी कांग्रेस (अजून जाहीर नाही)

संभाव्य 1) उमेश पाटील 2) झिशान सिद्दीकी

हेही वाचा

सांगोला : मंत्री कोठ्यातुन नोकरी लावतो म्हणुन 15 लाख रुपयांची फसवणूक

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon