दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
टॉप हेडलाईन्स | 17 मार्च 2025 | सोमवार
-
विधिमंडळ कामकाज: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण तिच्यात दुरुस्ती होणार, अर्थमंत्र्यांचे योजनेचे निकष बदलण्याचे संकेत
-
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
-
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
-
अजितदादांच्या राष्ट्रवादीचं विधानपरिषदेसाठी ठरलं! आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांना संधी; आता एकाच घरात दोन आमदार
-
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येचा मुद्दा सभागृहात, संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; अंबादास दानवेंनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर गृहमंत्र्यांचं उत्तर
-
देवेंद्र फडणवीस हा देवमाणूस, हर्षवर्धन सपकाळांनी त्यांच्याबद्दल बोलताना स्वत:ची लायकी ओळखून बोलावं; राम कदमांचा हल्लाबोल
-
लाडकी बहीण योजनेचे पैसे दारुवर उडवले; जाब विचारणाऱ्या बायकोवरच कोयत्याने हल्ला, सोलापूरच्या माढ्यातील घटना
-
अजित पवारांच्या नावाने धनंजय मुंडेंकडेच बीडचे पालकत्व: तृप्ती देसाई यांचा आरोप; वाल्मीक कराडला पाठिशी घालणाऱ्यांचे पुरावे SP ला दिले
-
प्रशांत कोरटकरच्या जामिनावर सुनावणी पूर्ण: कोल्हापूर सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला, कोरटकरला जेल की बेल? उद्या निर्णय
-
औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालणार नाही: देवेंद्र फडणवीस यांची भूमिका; शिवरायांच्या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा
-
रस्ता हवेत होत नाही, जमिनीवरच करावा लागतो: विरोधाला विरोध करणे सोडून द्या, अजित पवारांनी केले शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन
-
‘बरे झाले पक्ष फुटला’: अशा व्यक्तीसोबत काम करू शकत नाही- सुप्रिया सुळेंची टीका; मुंडेंनंतर आणखी एक विकेट जाणार असल्याचा दावा
-
हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस: त्यांची काँग्रेस बुडवण्यासाठी नेमणूक झाली; फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना केल्याने नारायण राणे संतप्त
-
सौरव गांगुलीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण: नेटफ्लिक्सवरील सीरीज खाकी: द बंगाल चॅप्टरमध्ये दिसणार, 20 मार्च रोजी प्रदर्शित होणार
-
IPL 2025-दिल्ली कॅपिटल्सने फाफ डु प्लेसिसला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले: मेगा लिलावात 2 कोटी रुपयांना विकत घेतले; अक्षर पटेल कर्णधार
-
उमरान मलिक संपूर्ण IPL हंगामातून बाहेर: कोलकाता संघात चेतन सकारियाची निवड; यापूर्वी नेट बॉलर म्हणून संघात होता