बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाच्या प्रमुखपदी सतीशभाऊ सावंत

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

चार तालुक्याची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी सतिशभाऊ सावंत यांच्यावर

सांगोला

गोरगरीब रुग्णांना 24 तास मदत करणारे, रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम तत्पर असणारे मा. नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांची वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पंढरपूर विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे व प्रमुख रामहरी राऊत यांनी दिले. यामध्ये सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस या चार तालुक्यांची जबाबदारी सतीशभाऊ सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालय 10 टक्के राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत करणे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन व सदैव तत्पर राहून मदत करणे, गंभीर, महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य करणे, तसेच पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मदत करावी असे निवडीच्या पत्रात नमूद केले आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना, राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे व या वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस या चार तालुक्याचा प्रमुख म्हणून माझी निवड केली आहे, माझ्यावर मोठा विश्‍वास टाकला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून चार तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना अहोरात्र आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तसेच वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी व आरोग्य संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र कटिबद्ध आहे. वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे घेणार त्याचबरोबर गोरगरीब रुग्णांच्या मोफत आरोग्याच्या तपासण्या करून मोफत औषधोपचार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सतीशभाऊ सावंत यांनी सांगितले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon