टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Satara News: महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी

Satara News: ८२ पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचा नवा प्रयोग; पाटण पुन्हा चर्चेत. मान्याचीवाडीचा आदर्श; राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी

सातारा: महाराष्ट्रासह देशभरातून तब्बल ८२ पुरस्कार मिळवलेली मान्याचीवाडी (Manyachi Wadi)  ग्रामपंचायत…आता पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे चर्चेत आली आहे, मान्याचीवाडीने (Manyachi Wadi) महाराष्ट्रातील पहिल्यांदाच जनावरांसाठी ‘ब्युटी पार्लर’ म्हणजेच अत्याधुनिक स्नानगृह सुरू केलं आहे…नदी-ओढ्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी उचललेलं हे पाऊल सध्या सर्वत्र कौतुकास्पद ठरतंय…पाहूया यावरचा हा विशेष रिपोर्ट…(Satara News)

Satara News: गावाला देशपातळीवर उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा सन्मानही मिळाला 

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात  असलेल्या गावातील मान्याचीवाडी (Manyachi Wadi)  ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे…आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाला देशपातळीवर उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा सन्मानही मिळाला आहे.आता या ग्रामपंचायतीने जनावरांसाठी अत्याधुनिक स्नानगृह उभारून एक नवा आदर्श निर्माण केला आहे…गावातील पाळीव जनावरांमुळे नदी-ओढ्यांमध्ये होणारं प्रदूषण रोखण्यासाठी हा अभिनव प्रयोग राबवण्यात आला आहे…या स्नानगृहात शॉवर, स्वच्छ पाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया अशा सुविधा उपलब्ध आहेत.(Manyachi Wadi)

Satara News: जनावरांसाठी शॉवरयुक्त स्नानगृह ही संकल्पना दुर्मिळ

विशेष म्हणजे जनावरांच्या आंघोळीनंतर निघणारं पाणी प्रक्रिया करून परसबागेसाठी वापरलं जातं…यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारत असताना पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळत आहे…ग्रामीण भागात जनावरांसाठी शॉवरयुक्त स्नानगृह ही संकल्पना दुर्मिळ असताना, मान्याचीवाडीने ती यशस्वी करून दाखवली आहे…हा उपक्रम आता राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरतो ठरत आहे..छोट्या गावातून मोठा संदेश देणारा हा उपक्रम आहे…मान्याचीवाडीचा हा प्रयोग राज्यभर राबवला गेला, तर पर्यावरण संरक्षणाला मोठी चालना मिळू शकते ..त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे..(Manyachi Wadi)

Satara News: स्थानिक प्रशासनासह पर्यावरणप्रेमींकडूनही पाठिंबा

या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्येही जनावरांच्या स्वच्छतेबाबत जागरूकता वाढताना दिसत आहे. पूर्वी जनावरांना नदी-ओढ्यांमध्ये धुतल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढत होते, मात्र आता स्नानगृहामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याशिवाय, जनावरांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात आंघोळ घातल्याने त्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होत आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाला स्थानिक प्रशासनासह पर्यावरणप्रेमींकडूनही पाठिंबा मिळत आहे. भविष्यात या संकल्पनेचा विस्तार करून अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधणारा हा प्रयोग राज्यभर राबवला गेला, तर गावागावांत स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

जगाची उडाली झोप, थेट जहाजावर गोळीबार करत.. होर्मुज हाहाकाराला सुरूवात

जमिनीची NA नोंद एका क्लिकवर; राज्य सरकारचा दमदार निर्णय, असा होणार मोठा फायदा

कधीही हाहाकार होऊ शकतो.. अमेरिकेची शस्त्रसंधी नव्हे तर.. इराणच्या दाव्याने खळबळ, थेट..

Pune Bus Accident CCTV : अचानक ब्रेक फेल, भरधाव बस लग्नपत्रिकेच्या दुकानात शिरली; पुण्यात भीषण अपघात

Gokul Election: गोकुळमध्ये भाजप सोडून मित्रपक्षाच्या पॅनेलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या, राष्ट्रवादीची मुश्रीफांकडे मागणी; भाजप, शिवसेना सोडून आणि कोणी मित्र आहेत का? भाजपचा खोचक सवाल!

US-Iran ceasefire : ‘हरलेल्यांंनी अटी घालायच्या नसतात..’ युद्धविरामादरम्यान हल्लाबोल, मोठ्या ऑफरला मारली लाथ