विरोधकांच्या घरी सुद्धा आम्ही अनेकदा गेलो आहोत. बाळासाहेब गेले आहेत, शरद पवार जातात पण हे तेवढ्यापुरतं असतं. बाकी आमचा वैचारिक संघर्ष जो असतो तो थांबत नाही, असे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut on Mohit Kamboj: मुलीच्या बर्थडेला आदित्य ठाकरे हे उपस्थित होते हा दिल्लीतला विषय नाही. शुभकार्याला जाणे चुकीचे नसून कोणी एखाद्या शुभकार्याला बोलावल असेल, तर ते जाण्यामध्ये चुकीचं नाही एवढंच माझं मत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासादर संजय राऊत यांनी दिली आहे. एखाद्याने शुभ काार्याला पुढे बोलावल असेल, तर तेवढ्यापुरती कटुता दूर ठेवून जर कोणी गेला असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारणं किंवा बातम्या देणं मला काही योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. राऊत म्हणाले, ती काय राजकीय जागा नव्हती. त्या कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित असं मी वाचलं कुठेतरी. विरोधकांच्या घरी सुद्धा आम्ही अनेकदा गेलो आहोत. बाळासाहेब गेले आहेत, शरद पवार जातात पण हे तेवढ्यापुरतं असतं. बाकी आमचा वैचारिक संघर्ष जो असतो तो थांबत नाही, असे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्याकडेही जाणार का?
शिंदे यांनी शुभकार्यासाठी बोलावले तर जाण्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, बोलवू द्या, त्यांच्याकडे आता कोणतं शुभ कार्य आहे असं मला दिसत नाही. कारण त्यांची सगळी कार्य पार पाडली आहेत. प्रसाद लाड यांच्या शुभकार्याला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावण्यावर ते म्हणाले की, ज्या प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनवर दगड मारण्याच्या अनुषंगाने विधान केलं तिथं जाण मला पटलं नव्हतं. भाजप आणि ठाकरे जवळ येत आहेत का? यावर ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाबरोबर आमचा संघर्ष हा आम्ही सुरू केला नसून हा संघर्ष त्यांनी सुरू केला 2014 पासून. जसं इराणवर अमेरिकेने युद्ध लादलं आणि इराण लढतंय आणि अमेरिकेला मागार घ्यावी लागते, इस्त्रायलला माघार घ्यावी लागते, आम्ही त्या भूमिकेत आहोत.
खासदार फुटण्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आणि म्हटले की, आमचे खासदार अजिबात फुटणार नाहीत. आमचे नऊ खासदार आहेत आणि शेवटपर्यंत नऊ खासदार पुढील निवडणूक होईपर्यंत राहतील. खासदार फोडण्याच्या पेरल्या जाणाऱ्या बातम्यांना त्यांनी ‘विकृती’ म्हटले आणि सत्ताधाऱ्यांना सुनावले, तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले ते आधी बघा आणि ते भाजपने लावले आहेत त्याच्यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेत असलेले दोन नेत्यांचा संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना आहे त्या परिस्थितीमधून फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपवताना तुम्हाला दिसेल चिंता करू नये, असेही ते म्हणाले.









