प्रभाग 3 मध्ये सर्वाधीक कमी 2073 मतदार तर प्रभाग 11 मध्ये 3952 सर्वाधीक मतदार
सांगोला :- सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यानुसार शहरात 33698 मतदारांची नोंद आहे.
सांगोला नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर सुमारे 446 हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने एका प्रभागातील नावे दुसर्या प्रभागात गेल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत कार्यवाही करून नगरपालिकेच्या प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.
त्यानुसार प्रभाग 1 मध्ये 1481 पुरुष मतदार, 1527 स्त्री मतदार व इतर 2 असे एकुण 3010 मतदार आहे.
प्रभाग 2 मध्ये 1751 पुरुष मतदार, 1724 स्त्री मतदार असे एकुण 3475 मतदार आहे.
प्रभाग 3 मध्ये 1019 पुरुष मतदार, 1054 स्त्री मतदार असे एकुण 2073 मतदार आहे.
प्रभाग 4 मध्ये 1627 पुरुष मतदार, 1682 स्त्री मतदार असे एकुण 3309 मतदार आहे.
प्रभाग 5 मध्ये 1525 पुरुष मतदार, 1528 स्त्री मतदार असे एकुण 3053 मतदार आहे.
प्रभाग 6 मध्ये 1489 पुरुष मतदार, 1349 स्त्री मतदार असे एकुण 2838 मतदार आहे.
संबंधित बातम्या
प्रभाग 7 मध्ये 1518 पुरुष मतदार, 1365 स्त्री मतदार असे एकुण 2883 मतदार आहे.
प्रभाग 8 मध्ये 1372 पुरुष मतदार, 1365 स्त्री मतदार असे एकुण 2737 मतदार आहे.
प्रभाग 9 मध्ये 1521 पुरुष मतदार, 1670 स्त्री मतदार असे एकुण 3191 मतदार आहे.
प्रभाग 10 मध्ये 1523 पुरुष मतदार, 1654 स्त्री मतदार असे एकुण 3177 मतदार आहे.
प्रभाग 11 मध्ये 2012 पुरुष मतदार, 1940 स्त्री मतदार असे एकुण 3952 मतदार आहे.




