सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक ; 40 मतदान केंद्रावर होणार मतदान होणार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला(प्रतिनिधी):- 2 डिसेंबरला होणार्‍या सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी 40 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी दिली.

प्रभाग 1 साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जि.प.प्रा.शाळा नायकुडे वस्ती आदी 3 मतदान केंद्रे असणार आहेत.

प्रभाग 2 साठी विद्यामंदीर प्रशाला, विद्यामंदीर प्रशाला, विद्यामंदीर प्रशाला, जि.प.प्रा.शाळा बिलेवाडी आदी 4 मतदान केंद्रे असणार आहेत.

प्रभाग 3 साठी जि.प्र.प्रा.शाळा भिमनगर, जि.प्र.प्रा.शाळा भिमनगर व माता बालक उत्कर्ष प्राथमिक विद्यालय आदी 3 मतदान केंद्रे असणार आहेत.

प्रभाग 4 साठी सांस्कृतिक भवन समाजमंदिर, सांस्कृतिक भवन समाजमंदिर, सनगर गल्ली समाज मंदिर व बौध्द विहार आदी 4 मतदान केंद्रे असणार आहेत.

प्रभाग 5 साठी जि.प्र.प्रा.शाळा पुजारवाडी, जि.प्र.प्रा.शाळा पुजारवाडी, जि.प्र.प्रा.शाळा पुजारवाडी व जि.प्र.प्रा.शाळा धनगर गल्ली आदी 4 मतदान केंद्रे असणार आहेत.

प्रभाग 6 साठी जि.प.प्रा.शाळा चांडोलेवाडी, जि.प.प्रा.शाळा माळवाडी व जि.प.प्रा.शाळा माळवाडी आदी 3 मतदान केंद्रे असणार आहेत.

प्रभाग 7 साठी सह्याद्री इंग्लिश मिडिअम स्कूल, सह्याद्री इंग्लिश मिडिअम स्कूल व सह्याद्री इंग्लिश मिडिअम स्कूल आदी 3 मतदान केंद्रे असणार आहेत.

प्रभाग 8 साठी न्यु इंग्लिश स्कुल, न्यु इंग्लिश स्कुल व न्यु इंग्लिश स्कुल आदी 3 मतदान केंद्रे असणार आहेत.

प्रभाग 9 साठी जि.प्र.प्रा.शाळा भोपळे रोड, जि.प्र.प्रा.शाळा भोपळे रोड, जि.प्र.प्रा.उर्दू शाळा भोपळे रोड व जि.प्र.प्रा.उर्दू शाळा भोपळे रोड खोली क्र.2 :- केंद्र क्र.4 आदी 4 मतदान केंद्रे असणार आहेत.

प्रभाग 10 साठी खडतरे गल्ली वाचनालय इमारत , खडतरे गल्ली महिला सभागृह, खडतरे गल्ली महिला सभागृह व कुंभारगल्ली समाज मंदीर आदी 4 मतदान केंद्रे असणार आहेत.

प्रभाग 11 साठी सांगोला गुरुकूल, वासूद रोड, सांगोला गुरुकूल, वासूद रोड पश्चिमाभिमुखी खोली क्र.2 केंद्र क्र.2, सांगोला महाविद्यालय, सांगोला महाविद्यालय व सांगोला महाविद्यालय आदी 5 मतदान केंद्रे असणार आहेत.

सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे ओबीसी राखीव निश्चित झाले असून सांगोला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता शहरात 11 प्रभागांमध्ये ही रचना करण्यात आली असून, त्यापैकी पहिल्या 10 प्रभागात द्विसदस्यीय तर एका प्रभाग त्रिसदस्यीय असे एकूण 23 सदस्य असणार आहेत. सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी शहरात 33 हजार 698 मतदारांची नोंद आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक होणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी सांगितले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon