Samsung ने अगदी कमी किंमत आणि भरपुर फिचर्स असे 3 फोन भारतात लाँच केले.
Samsung New 4G Phone Launch : Samsung ने भारतात आपले तीन नवीन 4G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, Galaxy A07, Galaxy F07 आणि Galaxy M07. हे तीनही फोन्स डिझाइन आणि फीचर्समध्ये जवळजवळ एकसारखेच आहेत. या फोन्समध्ये 6.7 इंचाचा HD Plus PLS LCD डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. परफॉर्मन्ससाठी यात MediaTek Helio G99 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही मिळतो.
या सीरिजमधील सर्व फोन 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसोबत येतात. स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवता येतं. सॉफ्टवेअरबाबत हे फोन्स Android 15 वर आधारित One UI 7 वर चालतील आणि Samsung ने या उपकरणांसाठी 6 मोठे OS अपडेट्स देण्याचे घोषित केलं आहे.
बॅटरी पॅावर तगडी की कमकुवत?
बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर या तीनही फोन्समध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनला IP54 रेटिंग मिळालंय, ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून थोड-फार संरक्षण मिळतं. वजन फक्त 184 ग्रॅम असल्यामुळे हे फोन्स हलके आणि वापरण्यास सोपे आहेत.
संबंधित बातम्या





काय असेल या फोन्सची किंमत?
किमतींच्या बाबतीत Galaxy A07 ची किंमत 8,999 रुपये आहे आणि हा फोन Samsung Store वर उपलब्ध असेल. Galaxy F07 ची किंमत 7,699 रुपये असून तो Flipkart वर विकत घेता येईल. Galaxy M07 ची किंमत 6,999 रुपये आहे आणि तो Amazon वर एक्सक्लुझिव्ह असेल. या तीनही मॉडेल्समध्ये ब्लॅक, ग्रीन आणि लाइट वायोलेट असे तीन कलर ऑप्शन्स मिळतील. जर तुम्ही बजेटमध्ये एक चांगला स्मार्टफोन शोधत असाल ज्यात बॅटरी, कॅमेरा आणि परफॉर्मन्सचा चांगला बॅलन्स मिळतो, तर Samsung चे हे नवीन A07, F07 आणि M07 मॉडेल्स तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात.