Rohit Pawar:आमची अपेक्षा होती की या अहवालात चुका होऊ नये. पण त्या झाल्या, यांनी बारामतीला जिल्हा करून टाकला. एआयबी किती गंभीर आहे यावरून ते दिसून येते असं म्हणत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Rohit Pawar on AAIB Report over Ajit Pawar Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरुन पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली असून, काही नवे आरोप आणि गौप्यस्फोट केले आहेत. रोहित पवारांची ही तिसरी पत्रकार परिषद असून, यावेळी त्यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी एएआयबीने दिलेल्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. एएआयबीनने अहवालात केलेल्या चुकांना अधोरेखित करताना त्यांनी पुन्हा एकदा व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे? अशी विचारणाकेली आहे. तसंच अॅरो कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यादरम्यान त्यांनी विमानतळाची रेकी करण्यासाठी काही लोक आले होते असं काहींनी सांगितल्याचा मोठा दावा केला आहे.
“दादांच्या अपघाताबाददल ज्या प्रकारे तपास झाला पाहिजे त्यावर आता वचक लागला आहे. दादांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र प्रयत्न करत आहे. मी व्हीएसआर, डीजीसीए विरोधात नाही, आमच्यात काही वैर नाही. जो अपघात झाला ते विमान व्हीएसआरचं होतं. डीजीसीएच्या अंतर्गत तपास सुरु आहे. अॅरो नावाचे कंपनी, कर्मचारी, मालक या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्य़ाशिवाय खरं कळणार नाही. व्हीएसआर आणि अॅरो यांना मुद्दामून टार्गेट करत नाही. डीजीसीएमधील अधिकाऱ्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ताकदवान लोकांच्या मदतीने वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर तपास योग्य पद्धतीने होणार नाही. या सर्वांकडे क्रिमिनल आणि तांत्रिक दृष्टीने पाहावं लागणार आहे,” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

“अजित पवारांचा दौरा पूर्वनियोजित नव्हता, तर रात्री ठरला होता. एकूण 90 टक्के इंधन भरलं होतं. विमानाचं आयुष्य 85 तास राहिलं आहे असं आपण म्हटलं होतं. पण खरं पाहायचं तर 8000 पर्यंत गेलं होतं. म्हणजे अधिकृत वैधतेपेक्षा 3000 तास इंजिन पुढे गेलं होतं. रनवे 29 सोडून 11 वर लँड करण्याचा प्रयत्न झाला हेदेखील सिद्ध होत आहे. मुख्य पायलट काही बोलत नव्हता हे ट्रान्सक्रिप्टमध्ये दिसत आहे,” असं रोहित पवारांनी सांगितलं.
“एखाद्या व्हीआयपीच्या किंवा कोणत्याही दुर्घटनेचा तपास होत असताना एनज्सीने डोळ्यात तेल घालून करण्याची गरज असते. हा रिपोर्ट बनवताना गडबड, चूका होऊ नये अपेक्षा होती. त्यांनी बारामतीला जिल्हा जाहीर केलं आहे. तपासात काही चुकता कामा नये. महापालिका आहे असं दाखवलं आहे. यातून एएआयबीचं गांभीर्य यातून दिसत आहे. पंखा डाव्या बाजूला झुकला होता पण रिपोर्टमध्ये चुकलं आहे. म्हणजे गोळी कुठे लागली हे विचारलं तर डोक्यात लागली असताना यांनी छातीत लागली असं सांगितलं आहे,” अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
“रिपोर्टमध्ये विमान झाडाला धडकल्याची चर्चा असताना, झाडं सांगितली आहेत. असं कुठली झाडं आहेत ज्यांना धडकून विमान खाली पडलं. विमान प़डलं तिथे झाडं नसून, झुडपालाही स्पर्श झाला नव्हता. झुडपाची उंची आणि विमान पडल्याची उंची मॅच होताना दिसत आहे. द्यायचा म्हणन रिपोर्ट दिला. झाडांवर जबाबदारी टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न यांनी केला आहे,” असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
तिथे काही लोकांशी बोलण्यावर समजलं आहे की, अजित पवारांच्या विमान दुर्घटनेआधी विमानतळाची रेकी करण्यासाठी काही लोक आले होते असा दावा आहे. याचा तपास करण्याची गरज आहे. सीआयडी आणि सीआयबीने यात लक्ष घालावं अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

त्यागी समितीने कुठला नियम बनवलेला? त्याचा अजितदादाच्या विमान अपघाताशी काय संबंध?
“व्हिजीबिलीटी नसताना या विमानाला बारामतीला जाण्याची परवानगी कशी दिली? टेक ऑफ करायला कसं दिलं? एआयएबीने त्याकडे दुर्लक्ष केलं. दोन्ही पायलटांना बारामती विमानतळावर लँडिंगची माहिती होती. त्यांना 29 नंबरचा रनवे आणि 11 नंबरचा कुठला हे माहीत होतं. या रिपोर्टमध्ये तसं नमूद केलं आहे. ते बारामतीत अनेकदा लँड झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय” असं रोहित पवार म्हणाले. अजित पवार विमान अपघात प्रकरणात रोहित पवार यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवलं. “2009 मध्ये वायएसआर रेड्डी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. त्यावेळी तपासासाठी नेमलेल्या त्यागी समितीने व्हिजीबिलीटी नसताना विमान लँड करायचं नाही, खासकरुन व्हिआयपी विमानात असताना, असं त्यागी समितीने म्हटलं होतं. वायएसआर रेड्डी यांचं निधन झाल्यावर त्यागी समिती नेमली होती. त्या समितीने हा रिपोर्ट दिला होता. तरीही व्हिजीबिलीटी नसताना विमान का लँड करण्यात आलं?” असा सवाल रोहित पवार यांनी विचारला.
“अॅरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन गव्हर्मेंट आणि सरकारी अधिकारी होते. त्यामुळे अॅरो नावाच्या ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एफआयआरमध्ये अॅरोमधील अधिकाऱ्यांचे नाव आलं पाहिजे” अशी मागणी रोहित पवार यांनी केली. “रिपोर्टनुसार विमान 4915 उडालं. लास्ट मेजर इन्स्पेक्शन 23 मार्च 2025 रोजी झालं होतं. याचा अर्थ हे विमान खराब होतं. त्यामुळे हे विमान अजितदादांना मुद्दाम दिलं का? असा संशय निर्माण होतो” याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं.
विमान शमशाबादला जाणार की नाही हे कळवलं नव्हतं
“जर्नी लॉग बुकमध्ये व्हिएसआर कंपनी कसा गोंधळ घालायची आणि डीजीसीए त्याला कसा सपोर्ट करायची ते दिसून येईल. शमशाबादला हे विमान जाणार होतं. पण बारामती एटीसीला हे विमान शमशाबादला जाणार की नाही हे कळवलं नव्हतं. मेलही केला नव्हता. रिपोर्टमध्ये फक्त बारामती टू बारामती असं उड्डाण दाखवलं आहे” असं रोहित पवार म्हणाले. “2023 च्या विमान अपघाताच्या एका अहवालात तपास अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली होती. या अहवालात तरी कोणाचेही नाव देण्यात आलेले नाही. दादांच्या बाबतीत भेदभाव का ? तपास अधिकाऱ्यांची नावे नाहीत याचा अर्थ ते घाबरले आहेत का ?” असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले








