दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.
-
सरकारने हिंदी भाषेबाबतचा निर्णय मागे घेतल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन, 5 जुलै रोजी विजयी मेळावा होणार; यावेळी कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार
-
सरकारने हिंदी भाषेचा निर्णय रद्द केला; तरीही ठाकरे बंधू एकत्र येणारच, विजयी मेळावा घेण्याबाबत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चर्चा, ठिकाण मात्र निश्चित नाही
-
मार्क मिळाले शंभर पैकी शंभर, कमळी आमची एक नंबर! पण या शंभर मार्कांत तिने EVM वापरलं होतं का? उद्धव ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका
-
नरेंद्र जाधवांच्या समितीवरून मराठी मनात संशयाचा धूर; उद्धव ठाकरेही म्हणाले, शिक्षण समितीवर अर्थतज्ज्ञ बसवला, असली थट्टा करू नये
-
सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही: ठाकरे बंधूंनी एकत्र क्रिकेट खेळावे, स्वीमिंग करावी आम्हाला काहीही अडचण नाही -फडणवीस
-
राज्यात गरीब, दुर्लक्षित समाजावर अन्याय: जयंत पाटील यांचा आरोप; देवेंद्र फडणवीस सरकारचे आर्थिक संतुलन पूर्णतः ढासळल्याचा दावा
-
धोनी कॅप्टन कूलचा ट्रेडमार्क बनवू इच्छितो: अर्ज केला, मंजूर झाल्यास त्यांच्या कोचिंग सेंटरला हे नाव देणार
-
GST चे 8 वर्षे पूर्ण: गेल्या 5 वर्षांत कर संकलन दुप्पट झाले; 2024-25 मध्ये दरमहा 1.84 लाख कोटी रुपयांचे कर संकलन
-
भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष: रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित, केंद्रीय निरीक्षकांकडे भरला अर्ज, 1 जुलैला होणार घोषणा
-
महाराष्ट्र पेटून उठल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय मागे घेतला: 11वीच्या पहिल्या यादीचा सरकारने घोळ घातला, आदित्य ठाकरेंचा आरोप
-
उद्धव ठाकरे यांचे मराठी प्रेम बेगडी: माजी मंत्री नारायण राणे यांची टीका; ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना इंग्रजीत का शिकवले? असा सवाल
-
फडणवीस, प्रफुल्ल पटेल, शिंदे अन् हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात, तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास तुम्हाला काय पोटदुखी; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
-
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, जून महिन्याचे 1500 रुपये लवकरच खात्यात येणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
-
हिमाचलमध्ये अतिवृष्टी-129 मार्ग बंद, 39 मृत्यू: भूस्खलनानंतर बोगद्यात वाहने अडकली; बिहारमध्ये वीज कोसळून 5 ठार
-
कमी बोला जास्त काम करा! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांना कानपिचक्या, म्हणाले, केलेल्या कामांची ब्रेकिंग न्यूज व्हावी
-
कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुख निवडीवरून मोठ्या उलथापालथी; संजय पवारांचा उपनेतेपदाचा राजीनामा, मात्र उद्धव ठाकरेंच्या पायाशी हनुमानासारखं कायम राहणार असल्याचं भाष्य
-
एजबेस्टनवर गिल भारताला पहिला विजय मिळवून देऊ शकेल का?: टीम इंडियाने येथे कधीही कसोटी जिंकलेली नाही, दुसरा सामना 2 जुलैपासून
-
ललित मोदींना 10.65 कोटी दंडातून दिलासा नाही: SC ने याचिका फेटाळली; 2009च्या IPL मधील अनियमिततेबद्दल ठोठावला होता दंड
-
₹600 त ज्युनियर आर्टिस्ट ते टीम इंडियापर्यंतचा प्रवास: वरुण म्हणाला- आर्किटेक्ट व संगीतकार होण्याचाही प्रयत्न केला; चॅम्पियन्स ट्रॉफीत 9 विकेट्स घेतल्या