दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा : 03 जुलै 2025 | गुरुवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  • दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, मुंबई पोलिसांची कोर्टात महत्त्वाची माहिती, दिशाचा मृत्यू अपघातीच

  • राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी; कोर्टातील अहवालानंतर दिशा सालियन प्रकरणात संजय राऊतांचा हल्लाबोल

  • दिशा सालियन प्रकरणी ठराविक लोकांकडून बदनामीचा प्रयत्न, पण मी बोलणार नाही; नितेश राणेंसंदर्भातील प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर

  • दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणे म्हणाले, 16 तारखेला काय ते बघू; विधानभवनात आदित्य ठाकरेंसमोरच केली मिमिक्री, व्हिडिओ व्हायरल

  • नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल, अटकेच्या भीतीने सगळे फरार अन् तेच भाजप गुन्हेगार आता भाजपा प्रवेश करत आहेत; संजय राऊतांचा हल्लाबोल

  • राज-उद्धव स्वार्थासाठी एकत्र, गवगवा कशाला, घरी बोलवा, मिठ्या मारा, राणेंनी एकाचेवळी दोन्ही ठाकरेंना अंगावर घेतलं!

  • पडळकर, सदावर्ते कुठे गेले? कुठं मांजर होऊन बसले? सदाभाऊ खोत 15 दिवस आझाद मैदानात झोपले; एसटी खड्ड्यात घातली, अनिल परबांचा विधानपरिषदेत हल्लाबोल

  • महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी गळ्याला दोरी लावली; राहुल गांधी म्हणाले, ही आकडेवारी नसून उद्ध्वस्त घरे आहेत, आणि सरकार गप्प

  • ही तर मतदान बंदी! बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार; इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या दारात

  • IND Vs ENG दुसरी कसोटी-शुभमनचे द्विशतक: इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय; भारताने 500 धावा पूर्ण केल्या

  • विधिमंडळ अधिवेशन: विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना कृषिमंत्रीच नाहीत, विरोधकांची नाराजी

  • मुंबईत व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर मनसेचे BJP ला थेट आव्हान: कोळी समाजाचा मोर्चा काढण्याचा इशारा; व्यापाऱ्यावर गंभीर आरोप

  • सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीपुरते आश्वासन दिले: नुकसानभरपाई म्हणून तात्काळ 50 हजार रुपये देण्यात यावे, भास्कर जाधवांची मागणी

  • आशिया कप हॉकीसाठी भारत दौऱ्यावर येणार पाकिस्तान: क्रीडा मंत्रालयाने म्हटले- आम्ही कोणालाही रोखणार नाही; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानींच्या प्रवेशावर बंदी घातली होती

  • बीडमध्ये शिवभोजन थाळी योजनेत भ्रष्टाचार!: अनुदान लाटण्यासाठी एकाच थाळीसमोर 50 जणांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल

  • केजरीवालांची गुजरातेत घोषणा- बिहार निवडणूक स्वबळावर: आता काँग्रेससोबत आघाडी नाही, इंडिया अलायन्स लोकसभेसाठी होती

  • भारताच्या U-19 संघाचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय: मालिकेत 2-1 अशी आघाडी; वैभव सूर्यवंशीने 31 चेंडूत 86 धावा केल्या

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon