टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

RCB Win IPL 2025 : विराट कोहलीची स्वप्नपूर्ती! ‘बंगळुरू’ आयपीएलचा नवा चॅम्पियन, 18 वर्षांनी ट्रॉफीवर नाव कोरले

Royal Challenger Bangalore Beat Punjab Kings IPL Final : शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने IPL 2025 चं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीचं नाव आयपीएलच्या विजेत्यांच्या ट्रॉफीवर कोरलं गेलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेक अपयश पाहिलेल्या या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज यंदा पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचून विजेतेपदाच्या खूप जवळ आला होता. मात्र अंतिम क्षणी RCB ने केलेल्या उत्कृष्ट खेळीने पंजाबचं स्वप्न भंगलं.

विराट कोहलीची स्वप्नपूर्ती!

विराट कोहलीसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. आयपीएलमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम गाठणाऱ्या या दिग्गज खेळाडूचं संघाला चॅम्पियन बनवण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCB ने याआधी अनेकदा प्लेऑफ आणि फायनल गाठल्या होत्या, पण ट्रॉफी नेहमी हुलकावणी देत होती. यंदा मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व बॅटिंग-बोलिंग डिपार्टमेंटमध्ये समतोल कामगिरी करत अखेरच्या क्षणी बाजी मारली.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Donald Trump : अमेरिका- इराण शांतता करारावर सस्पेन्स कायम, डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरील दावा इराणनं खोटा ठरवला, युद्ध थांबणार की भडकणार?

TET Exam: टीईटीमधून सुटका नाहीच… आला ‘सुप्रीम’ आदेश; गुरूजींना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणता दिलासा?

Manoj Jarange Patil: डोक्यावर भगवा गमछा गुंडाळला, खाली बाज टाकली, 40 डिग्रीच्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण सुरु; अंतरवालीमधील पहिले PHOTO

मोठी बातमी! ‘साहेब नाही जमणार, मी उपोषण करणारच…’ जरांगे पाटलांची विखे पाटलांसमोरच घोषणा

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ मध्ये, तीन दिवसात 53 धाडी अन् भेसळ करणारे 33 जण तुरुंगात; राज्यभरात FDA ची विशेष मोहीम

Gold Price Today : आजही सोन्याची पडझड सुरूच, सराफा बाजारात मोठी घडामोड, 10 ग्रॅम सोनं आज..