Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha : वरळी डोम येथे मराठी विजयी मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी तुफान गर्दी झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत. प्रचंड गर्दी झाली आहे.
- वरळी डोम येथे मराठी विजयी मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी तुफान गर्दी झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत.
- वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर जमलेले कार्यकर्ते आत घुसण्यासाठी अट्टहास करत आहेत. त्यांना आवरताना पोलिसांनाही नाकीनऊ येत आहेत. अनेक लोक त्यांच्याकडे असलेला पास दाखवत आहेत.
- वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. नागरिकांना आत जाण्यासाठी रेटा सुरु आहे. अखेर गेट उघडल्यानंतर लोक आत पळत सुटले.
- हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्याचा विजय म्हणून आज मराठी विजयी मेळावा होत आहे. 18 वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे एका मंचावर दिसणार आहेत.