सांगोला – बहुचर्चित सांगोला शहरातील मिरज रेल्वे गेट क्रमांक -32 खाली भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी अखेर ’ रेल्वे प्रशासनाकडून तूर्तास स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे सांगोला मिरज रेल्वे गेट क्रमांक -32 भुयारी मार्गा खालून नियमित सर्व प्रकारची वाहतूक सुरू राहणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे व्यापारी नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
सांगोला मिरज रोडवरील रेल्वे गेट क्रमांक -32 खाली भुयारी मार्गावरील रोड, भिंतीचे कामासह वॉटर ट्रीटमेंटचे काम करण्याकामी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत या कालावधीत तब्बल दोन महिने बंद राहणार होता.

ऐन लग्नसराई , सांगोला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक काळात बंद राहणार असल्यामुळे व्यापारी नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरणार होते त्यामुळे भुयारी मार्ग दुरुस्तीचा कालावधी कमी करून कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करावी या मागणीसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचेसह शहीद जवान बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष अच्युत फुले यांनी रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते तर यासंदर्भात शहरातील व्यापारी , शालेय विद्यार्थी, नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन अखेर ’पंढरपूर येथील रेल्वेचे सीनियर सेक्शन इंजिनियर यांनी लोकप्रतिनिधी व शहीद जवान बहुउद्देशीय संघटनेच्या निवेदनाची दखल घेऊन सदर भुयारी मार्गाच्या कामास तुर्तास स्थगिती दिली असे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी सांगितले.
संबंधित बातम्या



