टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Pune Horror: दुसरा चांगला नवरा मिळावा म्हणून महिलेचं पोटच्या गोळ्यासोबत भयंकर कांड, त्या घटनेनं पुणे हादरलं

Pune Horror: पुण्यातील शिरूर तालुक्यात एका क्रूर घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. ११ महिन्यांच्या बाळाची त्याच्याच जन्मदात्या आईने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुसऱ्या लग्नासाठी मुलगा अडसर ठरत असल्याने आईने मुलाचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा जीव घेतला आणि मृतदेह विहिरीत फेकला. या प्रकरणी आरोपी आईला अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासला आहे.

दुसरा चांगला नवरा मिळावा म्हणून महिलेचं पोटच्या गोळ्यासोबत भयंकर कांड, सिमेंटच्या ओट्यावरच... त्या घटनेनं पुणे हादरलं

राज्यात गेल्या काही काळापासून गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून पुण्यातील शिरूर येथे तर मनाचा थरकाप उडवणारी भयानक घटना घडली आहे. देवाचं दुसरं स्वरूप मानल्या जाणाऱ्या आईने, आपल्या पोटच्या गोळ्याची, अवघ्या 11 महिन्यांच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. दुसरा चांगला नवरा करायचा म्हणून 11 महिन्याच्या बाळाचा आईनेच खून केला. शिरूर तालुक्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे माणूसकीला अक्षरश: काळीमा फासलेला असून यामुळे सर्वच लोकं चक्रावले आहेत. एखादी आई एवढी निष्ठूर कशी होऊ शकते, हाच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. मयत मुलाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. या खुाप्रकरणी पूजा रवींद्र पवार या आईला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.

चांगला नवरा करायचा, मुलाचा अडसर नको म्हणून केली हत्या

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात हा भयानक प्रकार घडला. आरोपी महिला ही कोकण मुरुड येथून फिरून आली होती. मात्र 11 महिन्यांचा मुलगा, कु. यश रविंद्र पवार हा नेहमी किरकिर करायचा, रडायचा. यामुळे आरोपी पूजाने घरातून कुठेतरी निघून जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर दुसरा चांगला नवरा पाहून लग्न करावं असा तिचा प्लान होता, मात्र आपण जर आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन गेलो, तर कोणीही पाहणार नाही, आपल्याशी कोणीच लग्न करणार नाही अा विचार तिच्या मनात आला. आणि त्यामुळेच या मार्गातून मुलाला दूर करण्यासाठी तिने त्याचा काटा काढण्याचा कट रचला.

त्यानंतर आरोपी महिला पूजा हिने तिच्या पोटच्या गोळ्यीची, अवघ्या 11 महिन्यांचा मुलाची हत्या केली. तिने तिच्या लहान मुलाचं, यशचं डोकं हे सिमेंटच्या ओट्यावर आपटलं आणि त्याचा खून केला, अशी कबुली तिने दिली. एवढंच नव्हे तर या बद्दल कोणालाही कळू नये, गुन्हा उघडकीस येऊन नये, तो लपवण्यासाठी म्हणून तिने तिच्या मुलाचा मृतदेह एका बॅगेत भरला. आणि नंतर तिने ती बॅग शेतातील एका विहीरीत टाकून दिली. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जन्मदात्या आईकडूनच एवढा अमानुष प्रकार घडल्याने नागरिक संतापले असून लहान मुलाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मयत मुलाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव पोलीस स्टेश मध्ये तक्रार दिली होती, पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Gang leader killed after seeing Dhurandhar

मोठी बातमी : धुरंधर पाहून आलेल्या गँगच्या म्होरक्याला संपवलं, मग भावाने रुग्णालयात जाऊन बदला घेतला, नांदेडमध्ये डेंजर गँगवॉर

पोलीस निरीक्षक व अन्य कर्मचार्‍यांकडून अ‍ॅड.सागर मेटकरी यांना मारहाण, शिवीगाळ व धमकी

जळगावात दाम्पत्याची आत्महत्या; दोन मुलं उघड्यावर

जळगावात ‘हृदयद्रावक घटना’! शेतात दाम्पत्याची आत्महत्या; दोन चिमुकल्यांवर दु:खाचा डोंगर

Kalburgi Crime News: बायकोला मार मार मारलं, मग गाडीखाली झोपवून अंगावरुन फिरवली, फिरायला गेलेल्या दाम्पत्याच्या वादाने टोक गाठलं, हादरवणारी घटना

विश्वासघाताचा कळस: स्वतःच्याच मालकाला लुटणाऱ्या ड्रायव्हरचा सांगोला पोलिसांनी केला पर्दाफाश; चौघे जेरबंद