सांगोला (प्रतिनिधी): सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मुबीना मुजावर यांनी फार्मसी अभ्यासक्रमाच्या विषयावर पुस्तक प्रकाशित केले आहे .फार्माकोग्नसी या डी.फार्मसी प्रथम वर्षाच्या विषयावर त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले.
पिसिआय दिल्ली यांच्या इआर-2020 अभ्यास्क्रमाच्या मार्गदर्शक नियमानुसार त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले असून हे पुस्तक वालनट पब्लीकेशन, दिल्ली यांनी प्रकाशित केले आहे.या नामांकित वालनट पब्लीकेशन,दिल्ली यांचे देशात व विदेशात विविध शहरात त्यांच्या शाखा आहेत. या पुस्तकामध्ये फार्मसी क्षेत्राशी समंधित फार्माकोग्नसी विषयावरील सर्व मूलभूत माहिती, वनस्पती मध्ये असणारे औषधी गुणधर्म फार्मसी कंपनीमध्ये वापरणार्या विविध औषधी वनस्पती,वनस्पती मध्ये असणार्या औषधाच्या विश्लेषनाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धती व त्यांचा फार्मसी क्षेत्रास होणारा फायदा याचा समावेश या पुस्तकामध्ये केला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना यामधून मोलाचे मार्गदर्शन व लाभ होणार आहे.
त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.