PM Modi Foreign Visits Cost : पंतप्रधान मोदींच्या ३८ परदेश दौऱ्यांवर २५८ कोटींचा खर्च

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

PM Modi Foreign Visits Cost : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाची सविस्तर माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.

Rs 258 crore spent on PM Modi’s 38 foreign trips : केंद्र सरकारने गुरूवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा तपशील जारी केला आहे. यानुसार मोदी यांच्या मे २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या ३८ परदेश दौऱ्यावर जवळपास २५८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

या ३८ दौऱ्यांपैकी सर्वाधिक खरच् हा जून २०२३ मध्ये केलेल्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीसाठीसाठी २२ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला, पीटीआय या वृत्त वाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. ही माहिती परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा (Pabitra Margherita) यांनी गुरूवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंबंधीचा प्रश्न विचारला होता. त्यांनी भारतीय दूतावासांनी गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांसाठी एकूण किती खर्च केला याबद्दल खरगे यांनी विचारणा केली होती. ज्यामध्ये हॉटेल व्यवस्था, सामूहिक स्वागत समारंभ, वाहतूक याबरोबरच इतर खर्चाचा तपशील देखील विचारण्यात आला होता.

दरम्यान या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांसाठी झालेला खर्च तसेच अधिकार्‍यांवर झालेला खर्च, सोबत असणारे लोक, माध्यम डेलिगेशन, सुरक्षा व्यवस्था इत्यादींवर झालेल्या खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. सविस्तर देण्यात आलेली ही माहिती मे २०२२ ते डिसेंबर २०२४ या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांची आहे.

सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जून २०२३ रोजी केलेल्या अमेरिका दौऱ्यावर २२,८९,६८,५०९ रुपये इतका खर्च झाला होता, तर सप्टेंबर २०२४ मध्ये केलेल्या अमेरिकेच्या दौऱ्यावर १५,३३,७६,३४८ रुपये खर्च झाला.

दुसऱ्या काही महत्त्वाच्या दौऱ्यांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मे २०२३ मधील जपान दौऱ्यावर १७,१९,३३,३५६ रुपये आणि नेपाळच्या मे २०२२ मधील दौऱ्यावर ८०,०१,४८३ रुपये खर्च झाला.

कोणत्या देशांना भेटी दिल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ आणि २०२४ यांच्या मध्ये जर्मनी , कुवेत, डेन्मार्क, फ्रान्स, यूएई, उझबेकीस्तान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, दक्षिण अफ्रिका, ग्रीस, पोलंड, युक्रेन, रशिया, इटली, ब्राझील, गयाना या देशांना भेटी दिल्या आहेत.

कोणत्या दौऱ्यावर किती खर्च झाला?

पोलंड – १०,१०,१८,६८६ रुपये
युक्रेन – २,५२,०१,१६९ रुपये
रशिया – ५,३४,७१,७२६ रुपये
इटली – १४,३६,५५,२८९ रुपये
ब्राझील – ५,५१,८६,५९२ रुपये
गयाना – ५,४५,९१,४९५ रुपये

पंतप्रधान मोदींच्या मे २०२२ ते डिसेंबर २०२४ या काळातील ३८ दौऱ्यांचा खर्च सुमारे २५८ कोटी रुपये इतका आहे.

मोदींच्या दौऱ्यांची तुलना करण्यासाठी मंत्र्‍यांनी २०१४ पूर्वी माजी पंतप्रधानांनी केलेल्या मागील परदेश दौऱ्यांच्या खर्चाची माहिती देखील देण्यात आली आहे.

२०१४ पूर्वी पंतप्रधानांच्या दौऱ्यांवर झालेला खर्च

अमेरिका (२०११) – १०,७४,२७,३६३ रुपये

रशिया (२०१३) – ९,९५,७६,८९० रुपये

फ्रान्स (२०११) – ८,३३,४९,४६३ रुपये

जर्मनी (२०१३) – ६,०२,२३,४८४ रुपये

आधीच्या दौऱ्यांसाठी आलेल्या खर्चांच्या आकड्यांमध्ये महागाई किंवा चलनातील चढउतार विचारात घेण्यात आलेले नाहीत.

हेही वाचा

पोटाची चरबी होईल कमी, ‘या’ मसाल्यांचे पाणी पिताच मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon