किआ कॅरेन्स तीन इंजिन ऑप्शनसह इंडियन मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये १.५-लिटर डिझेल इंजिनचा समावेश आहे. हे इंजिन ११६hp पॉवर आणि २५०Nm टॉर्क जनरेट करते.
इंडियन मार्केटमध्ये परवडणाऱ्या ७-सीटर गाड्यांना मोठी मागणी आहे. या सेगमेंटमध्ये, किआ कॅरेन्स ग्राहकांना खूप आवडते. किआ मोटर्सच्या या कारने लाँच झाल्यानंतर ३६ महिन्यांत २ लाख युनिट विक्रीचा टप्पा गाठला आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२५ मध्ये एकूण ५ हजार ३१८ नवीन ग्राहकांनी किआ कॅरेन्स खरेदी केली आहे. कॅरेन्स ही इंडियन मार्केटमधील पॉप्यूलर ७-सीटर एमपीव्ही आहे. डिझेल आणि पेट्रोल दोन्ही ऑप्शनह येणारी ही कार मारुती एर्टिगाशी स्पर्धा करते. Kia Carens ची किंमत १०.६० लाख ते १९.७० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. Carens च्या पेट्रोल मॉडेलची किंमत १०.६० लाख ते १९.७० लाख रुपये आहे, तर डिझेल मॉडेलची किंमत १२.७० लाख ते १९ लाख रुपये दरम्यान आहे.
Kia Carens पॉवरट्रेन
किआ कॅरेन्स तीन इंजिन ऑप्शनसह इंडियन मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये १.५-लिटर डिझेल इंजिनचा समावेश आहे. हे इंजिन ११६hp पॉवर आणि २५०Nm टॉर्क जनरेट करते, १.५-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे ११५hp/१४४ Nm रेटिंग देते, तर १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन १६०hp आणि २५३Nm टॉर्क जनरेट करते.
या कारचे डिझेल इंजिन आता ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, ६-स्पीड आयएमटी (क्लचलेस मॅन्युअल) किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकसह उपलब्ध आहे. NA पेट्रोल इंजिन फक्त 6-स्पीड मॅन्युअलसह उपलब्ध आहे, तर 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन 6-स्पीड iMT आणि 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
Kia Carens मिळतील जबरदस्त फीचर्स
किआ कॅरेन्स ही एक बेस्ट फॅमिली कार आहे. या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 10.25 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले, क्रूझ कंट्रोल, सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंगसह व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स देण्यात आले आहेत जे लोकांना एक चांगला एक्सपिरियंस देतात.
कॅरेन्स मार्केटमध्ये स्पार्कलिंग सिल्व्हर, इम्पीरियल ब्लू, इंटेन्स रेड, क्लिअर व्हाइट, ग्लेशियर व्हाइट पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे अशा ८ वेगवेगळ्या कलरमध्ये उपलब्ध आहे. ही कार ६ आणि ७ सीटर ऑप्शनमध्ये येते.