Pandharpur Crime News: तरुणीने स्वतःच टॉयलेट धुण्याचे ॲसिड घेऊन अंधाराच्या ठिकाणी स्वतःच्या अंगावर ओतून घेतले होते.

पंढरपूर: पंढरपूर शहरात काल एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी रात्रभर केलेल्या सखोल तपासानंतर या प्रकरणात एक अत्यंत (Pandharpur Crime News) धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणीवर कोणताही हल्ला झाला नसून, तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.(Pandharpur Crime News)
Pandharpur Crime News: नेमका काय आहे प्रकार?
प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व प्रकार घरगुती वादातून आणि वैयक्तिक कारणातून घडला आहे. या तरुणीने स्वतःच घरातील टॉयलेट साफ करण्याचे ॲसिड घेतले आणि एका अंधाऱ्या ठिकाणी जाऊन ते स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यानंतर आपल्यावर अज्ञाताने ॲसिड हल्ला केल्याचा बनाव तिने रचला होता.(Pandharpur Crime News)
Pandharpur Crime News: पोलिसांनी असा लावला छडा
घटनेचे गांभीर्य ओळखून पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून तपासणी केली. तसेच पीडित तरुणीचे जबाब नोंदवले. मात्र, तिने दिलेल्या जबाबातील विसंगती आणि सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली न आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, अखेर त्या मुलीने स्वतःच हा बनाव रचल्याची कबुली दिली.(Pandharpur Crime News)
Pandharpur Crime News: घरगुती वादातून टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, घरात काही कारणावरून वाद झाले होते. याच वादातून घरच्यांना धडा शिकवण्यासाठी किंवा अन्य काही कारणास्तव तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
Pandharpur Crime News: पोलीस लवकरच अधिकृत माहिती देणार
या घटनेमुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता हा प्रकार बनावट असल्याचे समोर आले आहे.









