मंगळवारी दुपारी (22 एप्रिल) पहलकांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला . पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर एनआयएचे पथक श्रीनगरला पोहोचले आहे .फॉरेन्सिक टीम त्यांच्यासोबत आहे .
Pahalgam terrorist first photo: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 26 जणांचा मृत्यू झालाय. 13 जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी-विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करत गोळ्यांच्या फैरी झाडल्या. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा आता पहिला फोटो समोर आला आहे. पठाणी सूट घातलेल्या दहशतवाद्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्र दिसले आहे . या हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी संपूर्ण योजना आखली होती .हल्ला झाल्यानंतर कोणता मार्ग निवडायचा हेही ठरवण्यात आले होते . (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी ते कोणत्या धर्माचे आहेत अशी विचारणा केली .काही पर्यटकांना दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची भयानक माहितीही समोर येतेय . या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झालाय .
मंगळवारी दुपारी (22 एप्रिल) पहलकांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला .दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे .टीआरएफ या दहशतवादी संघटनेने अभियान हल्ल्याची जबाबदारी ही स्वीकारली आहे .मार्चमध्ये झालेल्या बर्फ वृष्टी नंतर अनेक पर्यटक काश्मीरला येतात .यंदा पर्यटन वाढल्यामुळे कश्मीरी नागरिक आनंदात असतानाच दहशतवाद्यांनी सर्वसामान्य पर्यटकांना टार्गेट करत हा भ्याड हल्ला केला आहे . दरम्यान, दहशतवाद्यांनी या हल्ल्यानंतर बाहेर पडण्याची योजना देखील आखली होती .हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेला मात्र हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर आला आहे .या फोटोच्या मदतीने सुरक्षा संस्थांना बरीच मदत मिळत आहे. हल्ल्यानंतर हा दहशतवादी पळून गेला आहे. लष्कराने पहलगाम मध्ये शोध मोहीम सुरू केली आहे .
पहलगाममध्ये लष्कराची शोध मोहीम सुरू
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर एनआयएचे पथक श्रीनगरला पोहोचले आहे .फॉरेन्सिक टीम त्यांच्यासोबत आहे . जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून हेलिकॉप्टरच्या मदतीने दहशतवाद्यांचा मागमूस काढला जात आहे .लष्कराचे जवान हे ड्रोन चा वापर करत शोध घेत असून भारतीय लष्कराने LH हेलिकॉप्टर तैनात केले आहेत .सर्च ऑपरेशन साठी लष्कर या हेलिकॉप्टर चा वापर करत आहे .