सांगोला नगर परिषदेमार्फत महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला

‘स्वच्छ सर्वेक्षण 2025’ व ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगोला नगर परिषदेमार्फत विविध स्पर्धा, कार्यशाळा व प्रशिक्षण तसेच ‘होममिनिस्टर – खेळ पैठणीचा’ यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दिनांक 6 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता *पाककला स्पर्धा* तसेच दुपारी 2.00 वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. वरील दोन्ही स्पर्धेतील प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकांना रक्कम रुपये 5 हजार , 3 हजार, 2 हजार व उत्तेजनार्थ बक्षीसही दिले जाणार आहेत.

दिनांक 7 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता महिलांसाठी ‘ केमिकल फ्री फ्रुट पल्प प्रिझर्वेशन व फ्लोरल ड्रिंक ( फुलांचे सरबत) या विषयावरती प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 8 मार्च 2025 रोजी ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’, लकी ड्रॉ व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील सर्व कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह ( टाऊन हॉल ) येथे होणार आहेत.

तरी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon