टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ओमराजे निंबाळकराचं अगोदरच ठरलं, विधानपरिषदेला सगळी मतं भाजप उमेदवाराला फिरवली, धाराशिव-लातूर विधानपरिषद निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली

ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात गेल्याने धाराशिवचे राजकारण बदलले आहे. विधान परिषद निवडणुकीत मविआला मोठा फटका बसला आहे.

Vidhan Parishad Election Result 2026 Omraje Nimbalkar: ठाकरे गटाचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विधान परिषद निवडणुकीत धाराशिव-लातूर मतदारसंघात महाविकास आघाडीला (MVA) दगा दिल्याचे समोर आले आहे. सोमवारी राज्यातील विधानपरिषदेच्या 17 पैकी 11 जागांवरील निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद मतदारसंघातून भाजपचे बसवराज पाटील (Basavraj Patil) यांचा विजयी झाला. तर काँग्रेसच्या महेश देशमुख यांचा पराभव झाला. या निकालावर नजर टाकल्यास याठिकाणी महाविकास आघाडीची मतं फुटल्याचे स्पष्ट होत आहे. ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याची घोषणा केली. मात्र, त्यांचा हा निर्णय अगोदरच ठरला होता. ते शेवटपर्यंत माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून मी शिंदे गटात जायचे की नाही, हा निर्णय घेईन, असे सांगत होते. मात्र, 18 जूनला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधील आपली सर्व मतं भाजपच्या बसवराज पाटील यांच्याकडे वळवल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (Dharashiv Latur Beed Vidhan Parishad Election Result 2026)

धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद निवडणुकीत बसवराज पाटील यांना 845 मतं मिळाली आहेत. 14 मतपत्रिका कोऱ्या होत्या. तर 14 मतं बाद ठरली. काँग्रेसच्या महेश देशमुख यांना फक्त 124 मतं मिळाली.  त्यामुळे भाजपच्या बसवराज पाटील यांचा 721 मतांनी विजय झाला. हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने झालेला विजय आहे. ओमराजे निंबाळकर यांनी दगाफटका केल्यामुळे या निवडणुकीत मविआची तब्बल 150 मतं फुटल्याचा अंदाज आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सातारा-सांगलीत भाजपला सर्वात मोठा धक्का, उमेदवार विजयी, पण… मोठा गेम काय झाला? धक्कादायक माहिती समोर

Bhaskar Jadhav and Milind Narvekar: आधी सहा खासदार फुटले, आता ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांमध्ये धुसफूस, तो व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?

सर्वात मोठी बातमी… 6 खासदारांचा आजच शिंदेसेनेत प्रवेश, फुल्ल प्लानिंग, टाइम टेबल समोर, ठाकरेंना मोठा झटका

Uddhav Thackeray on Sanjay Dina Patil : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे थेट संजय दिना पाटील यांचा मतदारसंघात पोहचले, भांडूपमधील सभेला गर्दी किती?

नाशिकमध्ये सगळ्यांना चक्रावून टाकणारा निकाल; विधान परिषदेच्या निवडणुकीतील 17 पैकी 17 विजयी उमेदवारांची यादी

Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खटल्याचा निकाल विरोधात जाताच ओमराजेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘शिंदे गटात जायचं की नाही, अजून ठरवलं नाही’