Ajit Pawar: दोषी नाही तर कारवाई नाही! देवगिरीवरच्या बैठकीनंतर अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना पुन्हा अभय

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Mumbai: धनंजय मुंडेंवरचे आरोप जोपर्यंत सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याचीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) घेतली असून दोषी नाही तर कारवाई नाही, असं म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची पाठराखण केल्याचं समजतेय. धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी देवगिरीत झालेल्या बैठकीत अजित पवारांनी ही भूमिका स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी सुरेश धस यांनी अजित पवारांच्या भेटीची मागणी केली होती, मात्र अजित पवारांनी ही भेट नाकारली होती. दरम्यान, देवगिरी बंगल्यावर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीत अजित पवारांनी ठाम भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, पुरावे जोपर्यंत नाहीत तोपर्यंत पक्ष कारवाई करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलीय.( Mumbai)

अजित पवारांची पुन्हा एकदा पाठराखण

गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख प्रकरण, वाल्मिक कराडशी असणारे आर्थिक हितसंबंध, कृषीघोटाळ्यावरून आरोप होत आहेत. धनंजय मुंडेंचा राजिनामा  घ्यावा असा दबाव वाढत असताना दुसरीकडे करुणा मुंडेंनी ओढलेले ताशेरे आणि वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे. या अनुषंगाने गुरुवारी रात्री देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन तास चर्चा केली. या चर्चदरम्यान धनंजय मुंडेंवरील  आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष कोणतीही कारवाई करणार नसल्याची भूमिका घेत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.

 

Ajit Pawar: दोषी नाही तर कारवाई नाही! अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना पुन्हा अभय

…नाही तर कारवाई नाही

 

सोलापूर जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा – संजय सेठी

सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं

शिखर धवन याचा अखेरच्या क्षणी चॅम्पियन्स ट्रॉफीत समावेश, आयसीसीची मोठी घोषणा

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon