सोलापूर जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा – संजय सेठी

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
सोलापूर जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा - संजय सेठी

सोलापूर, 13 फेब्रुवारी (हिं.स.)।

सोलापूर जिल्हा हा वस्त्रोद्यगांमध्ये संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. चादरी, टॉवेल व स्कूल युनिफॉर्मचे हब सोलापूर होत असून परदेशातही मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी यासाठी सोलापूर येथे टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून टेक्स्टाईल पार्क मंजूर करून घेऊ, असे प्रतिपादन परिवहन व बंदरे, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव संजय सेठी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व शासकीय विभागाचा आढावा पालक सचिव सेठी यांनी घेतला,त्याप्रसंगी ते बोलत होते.

पालक सचिव सेठी पुढे म्हणाले की, वस्त्रोद्योगात सोलापूर जिल्ह्याचे खूप मोठे नाव आहे व येथे पोषक वातावरण तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन सोलापूर जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. टेक्स्टाईल पार्क निर्माण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक प्रमाणात चालना मिळेल. त्याप्रमाणेच सोलापूर जिल्हा डाळिंब उत्पादनात अग्रेसर असून केळी निर्यातीत ही राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे जिल्ह्यात डाळिंब व केळी पिकावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी आवश्यक सर्व सहकार्य शासन स्तरावरून करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र शंभर दिवसात साफ सुत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाने या कार्यक्रमात आपला सक्रिय सहभाग घेऊन कार्यालयात नागरिकांना विविध सोयी सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या तक्रारी व कामे वेळेत मार्गी लावून त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कार्यालयाच्या स्वच्छतेबरोबरच अभिलेखांचे वर्गीकरण ही योग्य पद्धतीने करून ठेवावे व हा कार्यक्रम सातत्यपूर्ण सुरू ठेवावा, असे निर्देश पालक सचिव सेठी यांनी दिले.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात उद्योगांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे चिंचोली एमआयडीसी व अक्कलकोट एमआयडीसी अंतर्गत उद्योगांना पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राने आवश्यक पावले उचलावीत. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेलेला असून लवकरच हवाई मार्गाने ही जोडला जाईल. त्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला अधिक चालला मिळेल, असे सेठी यांनी सांगून विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून सोलापूर येथून विमान सेवा सुरू होण्याच्या अनुषंगाने येत असलेल्या अडचणीचा सविस्तर आढावा घेऊन त्यातून मार्ग काढण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon