News LIVE NOW 10 June 2025 : महत्वाच्या घडामोडी

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 10 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

  • 10 Jun 2025 11:15 AM (IST)

    पंढरपूर शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात

    पावसाने गेली काही दिवस उसंत घेतली होती. मात्र त्यानंतर आता पावसाने पंढरपूर शहर आणि परिसरात कमबॅक केलं आहे. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस बरसतोय. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.

  • 10 Jun 2025 11:12 AM (IST)

    येऊ का कणकवलीत? प्रकाश महाजन याचं नारायण राणेंना थेट आव्हान

    प्रकाश महाजन विरुद्ध नारायण राणे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. वयाच्या 73 व्या वर्षी प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात दंड थोपाटले आहेत. येऊ का कणकवलीत? असं म्हणत महाजन यांनी राणेंना थेट आव्हान दिलं आहे. तसेच कणकवलीत जिथे बोलवाल तिथे मी येईन, असंही महाजन स्पष्ट म्हणाले आहेत. महाजनांनी नितेश राणेंवर टीका केली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी 9 जून रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे सुनावलं होतं. त्यानंतर आता महाजन विरुद्ध राणे यांच्यात थेट वाद पाहायला मिळत आहे.

  • 10 Jun 2025 10:53 AM (IST)

    तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील माजी नगरसेवक विनोद गंगणेला न्यायालयाकडून पुन्हा पोलीस कोठडी

    तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणी माझी नगरसेवक गंगणे यांस सुनावणी दरम्यान कोर्टाच्या आवारातून करण्यात आली होती अटक…  पोलीस कोठडी संपल्याने धाराशिव जिल्हा न्यायालयात केले होते हजर… धाराशिव न्यायालयाने गंगणे यांस पुन्हा 12 जून पर्यंत दिली पोलिस कोठडी… ड्रग्स प्रकरणात सुनावणी दरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर न्यायाधीशांनी ओढले ताशेरे… तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 20, तर अजूनही 17 आरोपी फरार असल्याची माहिती…

  • 10 Jun 2025 10:40 AM (IST)

    मुंब्रा रेल्वेस्थानाकातील 4 प्रवाशांच्या मृत्यू दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवासाचा प्रश्न ही ऐरणीवर

    पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा रेल्वेस्थानक हा प्रवाशांच्या सर्वात मोठ्या गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. अनेक प्रवासी हे आपला जीव मुठीत घेऊन, दारावर लोंबकळत जीवघेणा प्रवास करत असतात… त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नालासोपारा रेल्वेस्थानाकात स्वतंत्र लोकल चालू कराव्यात अशी मागणी प्रवासी करत आहे.

  • 10 Jun 2025 10:27 AM (IST)

    चंद्रहार पाटलानं स्वार्थासाठी बेईमानी केली – संजय राऊत

    ज्या माणसाठी प्रतिष्ठा पणाला लावली तोही गेला… अपक्ष लढला असता तर 5 हजार मत पडली नसती.. आर्थिक लाभापोटी सर्व काही सुरु आहे… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे…

  • 10 Jun 2025 10:15 AM (IST)

    रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागासह इतर बागांच प्रचंड नुकसान

    हिंगोली याठिकाणी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागासह इतर बागांच प्रचंड नुकसान झालं आहे.

  • 10 Jun 2025 10:05 AM (IST)

    मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा धडक मोर्चा…

    मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा धडक मोर्चा… गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मनसेचा मोर्चा सुरु… अविनाश जाधव यांच्यासह ठाणेकर, रेल्वे प्रवासी मोर्चात सहभागी

  • 10 Jun 2025 09:58 AM (IST)

    राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे स्वागत

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा २६ वा वर्धापन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे साजरा होत आहे. बालगंधर्व रंगमंदिरा समोर ढोल ताशाच्या गजरात येणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं जात आहे.

  • 10 Jun 2025 09:47 AM (IST)

    बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरु

    बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलन तिसरा दिवसीही सुरु आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आज चांदूर बाजरमध्ये 50 पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि शेतकरी मुंडन आंदोलन करणार आहे.

  • 10 Jun 2025 09:27 AM (IST)

    मध्य रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने

    कल्याण ते सीएसटीकडे जाणारी स्लो ट्रॅकवर मध्य रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. यामुळे मुंब्रा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे.

  • 10 Jun 2025 09:08 AM (IST)

    पाच लाखांचे बियाणे जप्त

    यवतमाळच्या बाभुळगावात तालुक्यातील गवंडी येथे प्रतिबंधित 5 लाख 16 हजारांचे 400 बियाण्यांचे पॅकेट कृषी विभाग आणि पोलिसांनी जप्त केला. यावेळी तिघांना अटक केली असून दोन वाहनास एकूण 12 लाख 16 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • 10 Jun 2025 09:00 AM (IST)

    अमरावती- बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस

    अमरावती- बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी सह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आज चांदुर बाजारमध्ये 50 पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि शेतकरी मुंडन आंदोलन करणार आहेत.

  • 10 Jun 2025 08:50 AM (IST)

    जालना जिल्ह्याच्या विविध भागात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

    जालना जिल्ह्याच्या विविध भागात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असलं तरी मात्र दुसरीकडे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील लागवड आणि पेरण्या करण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे.

  • 10 Jun 2025 08:40 AM (IST)

    नाशिककरांकडून विमान सेवेची उच्चांकी गगन भरारी

    गतवर्षभरात तीन लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. ओझर विमानतळावरून शनिवारी 1334 नागरिकांनी प्रवास केला. नाशिक विमानतळावरून दिल्ली आणि बंगळुरू जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत अधिक वाढ झाली आहे.

  • 10 Jun 2025 08:30 AM (IST)

    मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींवर सर्जरी

    मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील अपघातात जखमी झालेल्या चार रुग्णांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सर्जरी होणार आहे. नऊ जणांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज, ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज कळवा रुग्णालयात असलेल्या सात जखमींपैकी चार जखमींवर शस्त्रक्रिया होणार असून यासाठी 16 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळत आहे.

  • 10 Jun 2025 08:20 AM (IST)

    मुंब्रा रेल्वे अपघातानंतर खबरदारी म्हणून वळण मार्गावर रेल्वेचा वेग कमी

    सोमवारी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातानंतर रेल्वेने खबरदारी म्हणून वळण मार्गावर वेग कमी केला आहे. मात्र दुसरीकडे रेल्वे प्रवासी अजूनही फूटबोर्डवर उभे राहून प्रवास करताना दिसत आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी लोकलच्या दारात उभं राहून प्रवास करणारे 13 प्रवासी खाली पडले. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. या घटनेनंतर रेल्वेनं खबरदारी म्हणून वळण मार्गावर वेग कमी केला आहे. असं असलं तरी असंख्य रेल्वे प्रवासी अजूनही फूटबोर्डवर उभं राहून प्रवास करताना दिसले. अपघात नेमका कसा झाला, हे अस्पष्ट असतानाच मुंबईतील सर्वच लोकलचे दरवाजे स्वयंचलित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. अपघातात जखमी झालेल्या चार रुग्णांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सर्जरी होणार आहे. नऊ जणांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज, ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज कळवा रुग्णालयात असलेल्या सात जखमींपैकी चार जखमींवर शस्त्रक्रिया होणार असून यासाठी 16 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळत आहे. तर उर्वरित जखमींना सूज असल्याने ती सूज उतरल्यानंतर त्यांच्यावर देखील शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती देखील डॉक्टरांकडून मिळत आहे.

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon