Aadhaar App चा वापर सोपा करण्यासाठी एक नवीन अॅप लाँच करण्यात आले आहे, जे UPI पेमेंटइतकेच सोपे असेल. OR कोड स्कॅन करून ओळख पडताळणी करता येईल, ज्यामुळे फसवणूक रोखण्यास मदत होईल. या अॅपमुळे हॉटेल, बँका अशा ठिकाणी Aadhaar ची फोटोकॉपी देण्याची गरज संपणार असून पर्सनल माहिती सुरक्षित राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया.
New Aadhaar App Benefits: आता Aadhaar कार्डचा वापर अधिक सोपा करण्यासाठी नवीन Aadhaar App लाँच करण्यात आले आहे. हे Aadhaar App चुटकीसरशी लोकांची पडताळणी करेल, असा दावा केला जात आहे. हे UPI पेमेंटइतकेच सोपे असेल. हो. आता तुम्हाला कसलाही अधिकचा त्रास घेण्याची गरज नाही. तुमचे Aadhaar App वर कामं अगदी सहज होतील.
ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या दुकानदाराला पैसे देण्यासाठी तुमच्या फोनमधून QR कोड स्कॅन करता, त्याचप्रमाणे येत्या काळात तुम्ही तुमच्या फोनमधून QR कोड स्कॅन करून आपली ओळख सिद्ध करू शकाल. हे अॅप भारतासाठी गेम चेंजर असल्याचे म्हटले जात आहे. कारण, आजकाल सर्व सेवांमध्ये Aadhaar चा वापर केला जातो. पडताळणी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी नवे अॅप उपयुक्त ठरणार आहे. नवीन Aadhaar App चे फायदे काय आहेत. चला तर मग जाणून घेऊया.
नवीन Aadhaar App चे नाव काय आहे?
नवीन Aadhaar App चे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र, काही रिपोर्ट्समध्ये m-Aadhaar अॅपच अपडेट करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हे नवे अॅपही UIDAI सोबत तयार करण्यात आले आहे. अॅपच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीची ओळख पडताळता येते. यामुळे समोरच्या व्यक्तीची ओळख योग्य आहे की नाही, हे कळण्यास मदत होईल. यामुळे फसवणूक रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
नवीन Aadhaar App कसे काम करेल?
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार याची पद्धत अतिशय सोपी आहे. तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये Aadhaar कार्ड ठेवण्याची गरज भासणार नाही. फक्त खिशात मोबाईल असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात जसे की परीक्षा केंद्र किंवा रुग्णालय किंवा बँकेतील कोणत्याही कामासाठी, तिथे गेल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नवीन Aadhaar App उघडावे लागेल. त्यानंतर तेथे लावलेला QR कोड स्कॅन करावा लागतो. स्कॅन होताच तुमची ओळख पडताळली जाईल.
या नव्या Aadhaar App मुळे भारताला डिजिटल इंडिया म्हणून जगात ओळख मिळेल. त्यामुळे लोकांचे जीवन सुकर होऊ शकते. भारत आपल्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करत आहे, यादृष्टीनेही हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
नव्या Aadhaar App चे 6 महत्त्वाचे फायदे
- हॉटेल रिसेप्शन, दुकाने, बँका आदी ठिकाणी Aadhaar कार्डची प्रत दाखवावी लागणार नाही.
- QR कोड स्कॅन करून तुमची व्हेरिफिकेशन होईल, यामुळे तुमची पर्सनल माहिती सुरक्षित राहील.
- Aadhaar ची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला तुमचे फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनर द्यावे लागणार नाही.
- Aadhaar कॉपीचा गैरवापर करून कोणीही बनावट करू शकणार नाही.
- Aadhaar कॉपी शेअर केल्यानंतर त्याचा गैरवापर होऊ नये, याची चिंता लोकांना सतावत आहे, आता काळजी करण्याची गरज नाही.
- स्मार्टफोनच्या पडताळणीमुळे अधिकाधिक लोकांना ‘या’ सुविधेचा वापर करता येणार आहे.
हेही वाचा
शरद पवार, अजित पवार एकत्र; रयत’च्या बैठकीतला किस्सा चर्चेत