शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची सांगोला एसटी आगाराला भेट
सांगोला /प्रतिनिधी :
सांगोला एसटी आगाराला शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवार दि. 3 मार्च रोजी भेट दिली. स्वारगेट बस स्थानकात नुकत्याच घडलेल्या वाईट घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. सध्या महिला सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याचा विचार करून सांगोला नगरपरिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने व शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी महिला सुरक्षेविषयी माहिती घेण्यासाठी सांगोला एसटी आगाराला भेट दिली. खेडेगावातून तालुक्यात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची संख्याही खूप मोठी आहे. तसेच सांगोला एसटी आगारांमध्ये महिला प्रवाशांची वर्दळ आहे. एसटी आगारांमध्ये माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या टीमने मुलींशी व प्रवाशांसी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन महिला सुरक्षेच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याची गरज असून प्रवाशांच्या अडचणी पूर्णपणे दूर करू असे आश्वासन दिले.
माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी एसटी आगारामध्ये महिलांसाठी बाथरूम व्यवस्था आहे का व ते स्वच्छ आहे का याची पाहणी केली. विद्यार्थ्यानी संवाद साधताना माजी नगराध्यक्षा सौ .राणीताई माने यांना आपल्या अडचणी सांगितल्या. महिम वरून येणाऱ्या विद्यार्थिनींनी सांगितले सकाळची7.30 वाजताची महीम एसटी बंद आहे ती सुरू व्हावी. आम्हाला शिक्षणासाठी येताना गाड्या उपलब्ध नसतेत त्यामुळे आम्ही कॉलेजला लवकर वेळेत येऊ शकत नाही. संध्याकाळी सांगोला अकलूज गाडी 4 :30 नंतर नाही तरी सांगोला अकलूज गाडी 5: 30 वाजण्याच्या दरम्यान सोडण्यात यावी असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
सांगोला एसटी आगारातील अधिकारी यांनी माहिती दिली की सांगोला एसटी आगारात 46 बसेस उपलब्ध आहेत. सांगोला एसटी आगाराला बसेची फार कमतरता आहे. सांगोला एसटी आगारामध्ये किमान 65 बसेस पाहिजेत त्यावेळी सर्व एसटी बसेस सुरळीत सुरू राहतील. सांगोला एसटी आगारात पुढील सहा महिन्यात 9 गाड्या स्क्रॅप होणार आहे त्यामुळे पुढे फार अडचण निर्माण होणार आहे. सांगोला एसटी आगाराला बसेसची पूर्तता होणे गरजेचे आहे. सांगोला एसटी आगारामध्ये संध्याकाळच्या वेळेस लाईट व्यवस्था अपुरी आहे. सांगोला एसटी स्टँडमध्ये पोलीस नियुक्ती करावी. तसेच दामिनी पथक कार्यरत असणे गरजेचे आहे त्यामुळे गुन्हेगारांना अटकाव होईल अशी मागणी यावेळी शिवसेना महिला तालुकाध्यक्ष राणीताई माने व शिवसेना महिला पदाधिकारी टीमने केली.
यावेळी शिवसेना महिला पदाधिकारी रुकसाना मुजावर शिवसेना महिला शहर संघटक, मनीषा लिगाडे शिवसेना महिला शहर उपप्रमुख, लतिका मोटे शिवसेना महिला शहर उपप्रमुख, शांता हाके आदी उपस्थित होते.
महिम येथून येणाऱ्या मुलींनी आपल्या तक्रारी माजी नगराध्यक्षा सौ राणीताई माने यांना सांगितल्या. सांगोला पंढरपूर एसटी मेथवडे स्टॉपला थांबत नाही त्यामुळे खूप अडचण येते . यावेळी सांगोला तालुका शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी आगारातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन महिला प्रवाशांच्या व खेड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या अडचणी त्यांना सांगितल्या. तसेच सांगोला एसटी आगारांमध्ये हिरकणी कक्ष नाही याचीही माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
हे सुद्धा वाचा
टीम इंडियाने काढला वर्ल्डकपचा वचपा; भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय!
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी