टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

NCP Politics: सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी ! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती

On: May 14, 2026 11:35 AM
Follow Us:

NCP Politics – जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीसोबतच खजिनदाराची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षाच्या निधीवर पूर्णपणे पवार कुटुंबाचेच नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत आहे

NCP Politics, Sunetra Pawar, Parth Pawar, Jay Pawar, Ajit Pawar NCP,
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक व्यवहारांची सर्व सूत्रे आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे
  • ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे मुख्य यादीतून वगळण्यात आली असून, जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीसह खजिनदाराची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी
  • या यादीला ‘टायपिंगची चूक’ असे संबोधून दोन दिवस उलटले तरी अद्याप नवीन दुरुस्त यादी समोर न आल्याने पक्षात संभ्रम आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी


NCP Politics  :
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २९ एप्रिल रोजीच्या यादीवरून पक्षात सुरू असलेला वाद अद्याप कायम आहे. या यादीत तांत्रिक चूक झाल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार यांनी दिले होते. मात्र, दोन दिवस उलटल्यानंतरही दुरुस्त केलेली नवी यादी जाहीर न झाल्याने, २९ एप्रिलचीच यादी अधिकृत मानली जात आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

याचे कारण म्हणजे  राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नव्या रचनेनुसार, पक्षाच्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण सूत्रे अध्यक्षा सुनेत्रा पवार, सरचिटणीस पार्थ पवार आणि राष्ट्रीय सचिव जय पवार यांच्याकडे एकवटल्याचे दिसत आहे. या यादीवरून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे मुख्य पदाधिकाऱ्यांच्या यादीतून वगळण्यात आली आहेत.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत नाव नसल्यामुळे पटेल-तटकरे आणि भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी याला ‘टायपिंगची चूक’ (Clerical Error) असल्याचे सांगत लवकरच दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दोन दिवस उलटूनही नवीन यादी समोर न आल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीसोबतच खजिनदाराची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षाच्या निधीवर पूर्णपणे पवार कुटुंबाचेच नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत आहे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 29 एप्रिलच्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या यादीनूसार (NCP National Executive List) राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहाराचं सर्व नियंत्रण पवार कुटुंबीयांच्या हाती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिजोरीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), पार्थ पवार (Parth Pawar) जय पवार (Jay Pawar) यांचीच पकड असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जमा निधीच्या आर्थिक व्यवहाराची सूत्र पवार मायलेकांच्या हाती असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या २९ एप्रिलच्या पत्रानुसार, सुनेत्रा पवार यांनी आपल्या दोन्ही मुलांना राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची स्थानं दिल्याचे समोर आले आहे. Parth Pawar यांची पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे पक्ष समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच Jay Pawar यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून, पक्षाच्या खजिनदारपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

याशिवाय Shivajirao Garje यांना खजिनदारपद कायम ठेवण्यात आले असून त्यांच्याकडे लेखापरीक्षण आणि हिशोबाची जबाबदारी देण्यात आली आहे.

२९ एप्रिलच्या यादीतील या नियुक्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे अधिकार पवार कुटुंबीयांच्या हाती केंद्रीत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तसेच दुरुस्त यादी कधी जाहीर होणार आणि पक्ष यावर अधिकृत भूमिका काय घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

अवघ्या तासाभराच्या पावसाने साताऱ्यात हाहा:कार, घरे, झाडे कोलमडली, अख्खी रात्र पावसात भिजत; गावकरी भयभीत

मंत्र्यांच्या ताफ्यापासून ते कॅन्टीनच्या मेन्यूपर्यंत.., फडणवीस सरकारकडून नियमावली जाहीर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now