Mumbai Pune Missing Link: येत्या 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
1/20

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंक या प्रकल्पाची काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
2/20

येत्या 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
3/20

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे 99 टक्के काम आता पूर्ण झाले असून, या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.
4/20

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे नागरिकांची घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
5/20

10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे.
6/20

सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो.
7/20

70 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे.
8/20

लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले.
9/20

मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही.
10/20

चारचाकी वाहने आणि बसेस यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
11/20

मिसिंग लिंक जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे.
12/20

हा मार्ग लोणावळा लेकच्या खाली हजार फूट असणार आहे.
13/20

जगातला सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरुन हा मिसिंग लिंक तयार केला आहे.

14/20

यामुळे नेहमीच्या वेळापेक्षा मुंबई-पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे.
15/20

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पर्यायी रस्ता (मिसिंग लिंक) लवकरच तयार होणार आहे. हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता.
16/20

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे 6 किलोमीटरने अंतर कमी होणार आहे.
17/20

या मिसिंग प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारण्यात आले आहे.
18/20

मिसिंग प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारण्यात आले आहे.
19/20

यातील पहिला बोगदा 8.92 किमी, तर दुसरा बोगदा 1.75 किमीचा आहे. तर या बोगद्याला जोडणारा आणि टागर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल-स्टेड पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर आहे.
20/20

जगातला सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरुन हा मिसिंग लिंक तयार केला आहे.













