टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

कोळा व बुद्धेहाळ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची मागणी

Follow Us:

सांगोला:- सांगोला तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या विकासासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठोस मागणी मांडली. कोळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश स्थळ, प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर तसेच बुद्धेहाळ तलाव या ठिकाणांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

सांगोला तालुक्यातील कोळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश जतन करून ठेवण्यात आलेला असून हे ठिकाण आंबेडकरी अनुयायांसाठी प्रेरणास्थान मानले जाते. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात नागरिक व अनुयायी भेट देतात. मात्र त्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा अपुर्‍या असल्याने येथे सुसज्ज अभ्यासिका व आधुनिक वाचनालय उभारणे, अस्थिकलशासाठी भव्य स्मारक उभारणे तसेच परिसराचा पर्यटन व प्रेरणास्थळ म्हणून विकास करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार देशमुख यांनी अधोरेखित केले.

कोळा येथील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर हे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून महाशिवरात्रीच्या काळात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र मंदिर परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व निवास सुविधा यांचा अभाव असल्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मंदिरासाठी स्वतंत्र तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून आवश्यक सुविधा उभाराव्यात व परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव हा निसर्गरम्य व विस्तीर्ण जलस्रोत असून पर्यटनाच्या दृष्टीने मोठी क्षमता आहे. तलाव परिसराचे सुशोभीकरण, चालण्याच्या पायवाटा व बगीचे तयार करणे, बसण्याची व्यवस्था व प्रकाशयोजना करणे तसेच नौकाविहार (बोटिंग) सुविधा सुरू करणे यांसारख्या उपाययोजना राबविल्यास पर्यटनाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार देशमुख यांनी व्यक्त केला.

सोलापूर : थकबाकी नसल्याने बुद्धेहाळ तलाव सिंचन सुरळीत

या तिन्ही ठिकाणांचा विकास झाल्यास धार्मिक पर्यटन वाढीस लागेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती होईल, असे नमूद करत शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक निधीची तरतूद करून विकासकामांना तातडीने सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now