Mansoon Alert : पेरणीची नको घाई; 9 दिवस अंगाची लाही लाही, जूनमध्ये निघेल घामाटा, या तारेखापासून मान्सूनचा दिलासा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Mansoon Alert : देशातील शेती आणि शेतकरी अजूनही पावसावरच अवलंबून आहे. सिंचनाची अजूनही देशात सोय नाही. सध्या मान्सून थंडावला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. काय आहे पावसाचा सांगावा?

देशातील शेती आणि शेतकरी आजही पावसावर अवलंबून आहे. सिंचनाची सोय नसल्याने कास्तकार या दुष्टचक्राच्या कचाट्यात दरवर्षी भरडल्या जातो. शेती जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. या तीन महिन्यातील पावसावरच शेतकीचा खटाटोप करावा लागतो. पूर्व मान्सून, अवकाळीने मे महिन्याचा संदर्भ बदलून टाकला. पण मान्सूनची गती मंदावली. त्यामुळे जून महिन्यात उष्णतेचा, दमटपणाचा कहर दिसून येत आहे. हवामान खात्यानुसार, अजून 9 दिवस अंगाची लाही लाही होईल. 16 वर्षानंतर मान्सून त्याच्या नियोजीत वेळेपूर्वी आला. पण आता त्याने थोडा ब्रेक घेतला आहे. तो 11-12 जून रोजी पु्न्हा सक्रिय होण्याची दाट अंदाज आहे. काय आहे मान्सूनची अपडेट?

मान्सून हाच लाईफलाईन

4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या भारताची लाईफलाईन मान्सूनच आहे. मान्सून देशाचा 70 टक्के भूभाग व्यापतो. पीकांना, गुरढोरांना, मनुष्याला आणि इतर अनेक घटकांना ‘जीवन’ देतो. त्यांना नवनिर्मितीची आस देतो. सध्या देशात धरण, तलाव आणि नदी, विहिरी, इंधनविहिरी हे पाण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पाण्यावरच देशाची शेती अवलंबून आहे.

11-12 जून दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय

पुणे वेधशाळेनुसार, हवामान खात्यानुसार, मान्सूनची गती गेल्या काही दिवसात मंदावली आहे. यामध्ये 11-12 जून दरम्यान तेजी येईल. उर्वरीत भाग लवकरच मान्सूनमय होईल. पावसाचे आगमन होईल. शेतीच्या कामांना गती येईल. 24 मे रोजी मान्सून केरळ मार्गाने राज्यात लवकर दाखल झाला होता. देशाच्या दक्षिण, उत्तर पश्चिम आणि पश्चिम भागात त्याने हजेरी लावली. पण त्याचा उत्साह टिकला नाही. त्याची गती मंदावली. हवामान खात्यानुसार, पश्चिम बंगालमधून मान्सूनला अजून बळ मिळेल. लवकरच देशभरात मान्सून सक्रिय होईल.

बंगालमधून पावसाचा सांगावा

हवामान खात्यानुसार, 11 जून रोजीच्या जवळपास बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठीचे अनुकूल वातावरण तयार होईल. त्यामुळे देशाच्या उत्तरी भागात पावसाचे आगमन होईल. केरळमध्ये 1 जूनपासून मान्सून सक्रिय होऊन तो देशभर प्रवास करतो. त्यामुळे शेतीच्या कामाला वेग येतो. सध्या पावसाने हात दाखवल्याने शेतीची कामे खोळंबली आहे. शेतकर्‍यांनी जोरदार पावसाची प्रतिक्षा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नाहीतर दुबार पेरणीच्या कचाट्यात शेतकरी सापडू शकतो.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon