टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, म्हणाले, आता आर-पारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Marathi Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे.

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Marathi Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच (Mumbai) होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आज मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं? आणि आता काय मिळवायचं? या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली.

 

आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही

या बैठकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.”आपल्याला रणभूमीत उतरायचं आहे आणि विजयही निश्चित मिळवायचा आहे. रणभूमीची तयारी अशी असली पाहिजे की, यावेळी यश आपलंच असणार,” असे ठाम शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. मैदान आपणच गाजवायचं असून, विजयाचा गुलालही आपल्या अंगावरच उधळला गेला पाहिजे.” मागील दोन वर्षांपासून मराठा समाजासाठी आंदोलन सुरू असून, आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. “ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने पार पाडली पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केलं.

विजयाची चाहूल लागली

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघायचे आहे. कुठेही न थांबता 28 ऑगस्टला रात्री मुंबईत पोहचायचे आहे.  मुंबईतील सर्वच लोकांनी मागे आपली सेवा केली, त्यात परप्रांतीय लोकांनी सुद्धा आपली सेवा केली आहे.  पावसाचे दिवस असून मला तुम्ही मुंबईत सोडायला या, पुढचं मी पाहतो. आता अशी संधी पुन्हा मिळणार नसून विजयाची चाहूल लागली आहे, असे त्यांनी म्हटले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर…

Vidhan Parishad Election 2026: 12-4-1…विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल, कुणाला किती जागा?

What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?

Ambenali Ghat Scorpio Accident: चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयानक दृश्य

आंबेनळी घाटातील अपघाताचं कारण आलं समोर, दिवसभर थकल्यानंतर रात्री… पोलिसांची मोठी अपडेट काय?

इराण आणि अमेरिका युद्धविराम करारात इस्त्रायलचा मिठाचा खडा, जगावर मोठं संकट..