माजंरी: बाजार संपवून गावाकडे परत निघालेल्या दोघांचा गंभीर अपघात; एकाचा जागीच मृत्यू

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला(प्रतिनिधी):- एस टी बसने राँग साईडला येवून दुचाकीला धडक दिल्याने जनावरांचा बाजार संपवून गावाकडे परत निघालेल्या दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना दि. 25 मे 2025 दुपारी 2.30 वाजणेचे सुमारास सांगोला तालुक्यातील मांजरी गावचे हददीत पेट्रोलपंपासमोर घडली.

अपघातामध्ये मंगेश भारत कांबळे याचा दुर्दैवी अंत झाला आहे. अपघाताची फिर्याद श्रीकांत कांबळे (रा.पोहरगाव ता.पंढरपुर, जि.सोलापूर) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.

अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, दि 25 मे 2025 रोजी सकाळी 8.30 वा चे सुमारास मंगेश भारत कांबळे व दिपक भागवत गायकवाड हे स्प्लेंडर मोटारसायकल वरून सांगोला येथील बाजारात गाय घेण्यासाठी निघाले होते.

दुपारी 2.30 वाजणेचे सुमारास बाजार संपलेनंतर गावी परत जात असताना सांगोला ते पंढरपुर जाणारे रोडवर मौजे मांजरी गावचे हददीत पेट्रोलपंपासमोरील ब्रिजवर आले असता समोरून येणार्‍या लातुर ते रत्नागिरी जाणार्‍या बस ने राँग साईडला येवुन समोरून जोराची धडक दिल्याने मंगेश कांबळे यास डोकीस गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच त्याचे पाठीमागे बसलेला दिपक भागवत गायकवाड यास डोकीस तसेच हातापायास मार लागुन तो जखमी झाला आहे. त्यास उपचाराकरीता सद्गुरू हॉस्पिटल सांगोला येथे दाखल केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon