टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Maharashtra Weather Monsoon Update: राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यता; पण, 10 जूनपर्यंत मान्सून नाहीच; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात हळूहळू बदल होत असून, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Weather Monsoon Update: राज्यातील हवामानात (Weather) आता हळूहळू बदल होत असून, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज, 1 जूनपासून राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस अधिकृत मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) स्वरूपाचा आहे. सध्याच्या स्थितीनुसार, राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची (Monsoon Arrival) शक्यता नाही, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची (Sowing) घाई करू नये, असे आवाहन कृषी (Agriculture Department) आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

Maharashtra Weather Monsoon Update: विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात दुपारनंतर मेघगर्जना

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ (Vidarbha Rain Alert), मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेश या भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात. कोकण किनारपट्टीवरही काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील सरासरी तापमानात काही प्रमाणात घट होणार असली, तरी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान (Maximum Temperature) अजूनही 40 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Monsoon Update: सध्याच्या पावसाचा मान्सूनशी थेट संबंध नाही 

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या राज्यात होत असलेल्या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही थेट संबंध नाही. मान्सून अद्याप केरळात (Kerala) पूर्णपणे दाखल झालेला नसल्याने, महाराष्ट्रात त्याचे आगमन होण्यास किमान 10 जून उजाडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Weather Monsoon Update: प्रशासनाकडून सुरक्षेचे आवाहन

विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी सुरक्षित आश्रय घ्यावा. झाडाखाली, शेडखाली किंवा विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्यांच्या जवळ उभे राहू नये. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. शेतकऱ्यांनी मान्सूनची नियमित प्रगती लक्षात घेऊनच पुढील कृषी निर्णय घ्यावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update: मुंबईत दिलासा, तर साताऱ्यात गारपीट

दरम्यान, काल मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दुसरीकडे, सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव तालुक्यात डिस्कळ, ललगुण आणि बुध परिसरात वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली. अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी ! युद्धाला पुन्हा सुरुवात? अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला

सोलापूर विधान परिषद निवडणूक: शेकापचा भाजपला पाठिंबा, राजकीय समीकरणे बदलणार!

Shirdi Accident : बस अन् अर्टिगाचा भीषण अपघात, कारचा अक्षरश: चक्काचूर, दोन सख्ख्या भावांचा करुण अंत; लेकरांना बघून माऊलीचा मन हेलावणारा टाहो

Live : अमेरिकेने इराणच्या रडार-ड्रोन नियंत्रण स्थळांवर हल्ला केला:इराणने प्रत्युत्तरादाखल एअरबेसवर हल्ला केला; इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याचा दावा

Sunil Tatkare: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, अखेर तटकरेंची कबुली; दादानंतर विलिनीकरण का नाही? थेट सांगितलं

IPL 2026 Gujarat Titans : गुजरात टायटन्सच्या खेळाडूंच्या बसचा टळला मोठा अपघात, थोडक्यात वाचला जीव,अचानक..